मूल प्रतिनिधी:- शहरवासीयांची प्रेरणा आणि आकर्षण ठरलेल्या आद्यशक्ती, महिषासुर मर्दीनी श्री माँ दुर्गा देवी मंदीराचा सहावा वर्धापन दिन सोहळा शनिवार २६ फेब्रुवारी रोजी आयोजित केला आहे.
तामीलनाडु येथील महाबलीपुरम येथुन विशिष्ठ जातीच्या एका अखंड दगडामध्ये कोरलेली पाच फुट उंचीची मुर्ती आकर्षक व मनोहारी असुन अनेकांच्या इच्छा आणि स्वनाची पुर्तता करणारी पावन विघ्नहर्ती ठरली आहे. त्यामूळे जागृत देवस्थान म्हणून तालुक्यात नावारूपास आले आहे. दरवर्षी देवीचा नवराञौत्सव आणि मंदीराचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मीक उपक्रमाने साजरा केल्या जाते.
मागील वर्षी मंदीर समितीच्या वतीने कोरोना प्रादुर्भावाचे काळात शासनाला सहकार्य करणाऱ्या तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी, शासकीय व खाजगी डाँक्टर, परीचारीका, शिक्षक, सफाई कर्मचारी याशिवाय सामाजिक व विविध क्षेत्रातील पस्तीस व्यक्तींचा कोरोना योध्दा म्हणुन सत्कार केला होता, दरवर्षी साजरा होणारा नवराञौत्सव स्थानिक भक्तांना धार्मिक पर्वणी ठरणारी असल्याने परिसरातील मातेचे हजारो भक्तगण मोठया भक्तीभावाने व श्रद्धेने दुर्गा देवीच्या दर्शनासाठी येत असतात. दररोज सकाळी ८ वा. व संध्याकाळी ७ वा. होणारी देवीची आरती भावीकांच्या धार्मिक भावना जोपासत आहे.
शहरवासीयांना प्रेरणा आणि श्रध्दास्थान ठरलेल्या येथील श्री माँ दुर्गा देवी मंदीराचा २६ फेब्रुवारी २०२२ रोज शनिवारला ६ वा वर्धापनदिन. त्यानिमित्य मंदीर समितीचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात पंडीत मुकेश महाराज यांचे हस्ते सकाळी ८ वा. कलश पुजनानंतर ९ वाजता माँ दुर्गा देवीचा पंचामृताने अभिषेक होणार आहे. दुपारी १ वा. महीला भगिनींसाठी कुंकुम पुजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. संध्याकाळी ६ वाजतापासुन महाप्रसाद वितरण होणार आहे. आयोजीत कार्यक्रमांना भक्तगणांनी उपस्थित राहावे. अशी विनंती समितीचे अध्यक्ष संतोषसिंह रावत आणि संचालक मंडळींनी केली आहे.