कोजबी (माल) येथे श्री महर्षी वाल्मिकी ऋषी महोत्सव सोहळा व संस्थेच्या वरच्या इमारतीचे वास्तुपुजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

नगभिड प्रतिनिधी:- श्री महर्षी वाल्मीकी ढिवर समाज सुधारक मंडळ, कोजबी माल ता. नागभीड, जिल्हा- चंद्रपूर यांचे सौजन्याने दि.२७/०२/२०२२ ला मच्छिंद्रनाथ मच्छी. सह. संस्था मर्यादित कोजबी माल र.न. ११०२ येथे श्री महर्षी वाल्मिकी ऋषी सोहळा व वरच्या इमारतीचे वास्तुपुजन सोहळा करण्यात आला.

दि. २७/०२/२०२२ ला सकाळी १०.०० वा. घटस्थापना होम हवन आणि इमारतीचे वास्तुपुजन ह.भ.प. श्री मुखरूजी मारभते यांच्या हस्ते १२.०० वा. संपन्न झाला. तसेच महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम व महिलांची कबड्डी स्पर्धा घेण्यात आली, आणि रात्री श्री गुरुदेव भजन मंडळ तळोधी(नाईक), भगवती महिला मंडळ काजळसर, अखिल भारतीय सहज भजन मंडळ कोजबी चक, व विठ्ठल रुख्मिनी भजन मंडळ गोविंदपूर. यांच्या वतीने भजन संध्या कार्यक्रम घेण्यात आला. दि. २८/०२/२०२२ ला सकाळी ८.०० वा. डॉ.शिवरकर चिमूर, यांच्या मार्गदर्शनात महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीत श्री. रवींद्र पा. पर्वत यांच्या तर्फे भाविकांना शरबत वाटप करण्यात आले.तसेच दौलतजी शिवणकर कोजबी(चक) , दिपकजी भेंडारे कोजबी(चक), चेतन किसनजी कामडी कोजबी(चक),दादाजी बोरकर कोजबी(चक) यांच्या कडून भाविकांसाठी ठीक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच दुपारी १२.०० वा. पाहुण्यांचे आगमन झाले व कार्यक्रमाचे उद्धघाटक मान. श्री प्रकाशजी डहारे(निवृत्त सह. संचालक, विदर्भ विकास मंडळ, नागपूर), अध्यक्ष श्री. दिनानाथजी वाघमारे(संघर्ष वाहिनी नागपूर), संतोष रडके, प्रा.राजेशजी डहारे(सर्वोदय विद्यालय सिंदेवाही), रंजनताई पारशिवें, नंदाताई ठाकरे( मत्स्य जिल्हा संघ, चंद्रपूर) , एकनाथजी ठाकरे(मत्स्य जिल्हा संघ, चंद्रपूर), मनोहरजी शेंडे(मत्स्य जिल्हा संघ चंद्रपूर), भिकाजी शेंडे, खोजरामजी मरसकोल्हे(जि.प.सदस्य चंद्रपूर), डॉ सुजित मेश्राम, सोनू बोनगीरवार, स्वप्नील गोपाले(PSI चंद्रपूर) यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन लाभले व ग्राम पंचायत पदाधिकारी तसेच पो. पा. दौलतजी म्हस्के व समस्त गावकरी महिला, पुरुष आणि जि. प. शाळा कोजबी, कोजबी चक, सरस्वती विद्यालय कोजबी चक चे विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते. आणि सायंकाळी गोपालकाला व गावभोजन देण्यात आले. यासाठी अध्यक्ष सचिव आणि इतर सर्व सभासदांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.