भाजपा कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

मूल (प्रतिनिधी): भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती भारतीय जनता पार्टी मूलच्या कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाला भाजपाचे मूल शहराध्यक्ष प्रभाकर भोयर, सरचिटणीस चंद्रकांत आष्टणकर, अजय गोगुलवार, मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, माजी सभापती प्रशांत समर्थ, अनिल साखरकर, मिलींद खोब्रागडे, विनोद सिडाम, राकेश ठाकरे, प्रज्योत रामटेके, नंदु कागदेलवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘‘झिंदाबाद’’ च्या घोषणा ही देण्यात आले.

जयंती कार्यक्रमाला भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here