भाजीपालाच्या वाडीत बिबट्याचा पिल्लु आढळला

उथळपेठ येथील घटना

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील उथळपेठ येथील वामन किन्नाके यांच्या शेतातील भाजीपालाच्या वाडीत बिबट्याचे पिल्लु असल्याची माहिती गावकऱ्यांनी वनविभाग व संजीवन पर्यावरण संस्थेला दिली. माहितीच्या आधारे वनविभाग व संजीवन संस्थेचे पदाधिकारी घटनास्थळी पोहचून बिबट्याच्या पिल्लू ला जैरबंद केले.

मूल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत, चिचपल्ली वनविभाग अंतर्गत येणाऱ्या उथळपेठ हे गाव जंगलाला लागून आहे, येथीलच वामन किन्नाके यांच्या शेतात भाजीपाला लागवड केली जाते याच ठिकाणी गुरुवारी दुपारी 3.30 वाजता दरम्यान बिबट्याचे पिल्लु असल्याचे गावकऱ्यांनी बघितले, सदर माहिती त्यांनी वनविभाग आणि संजीवनी पर्यावरण संस्थेला दिली, संस्थेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल होऊन जवळपास साडेतीन महीन्याचा बिबटच्या पिल्ल्याला सुरक्षीतपणे पकडले व चंद्रपूर येथील टी. टी. सी. येथे पाठवन्यात आले. घटनास्थळावर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती

सदर कार्यवाही क्षेत्र सहाय्यक प्रशांत खनके, संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, प्रभाकर धोटे, स्वप्नील आक्केवार, वनरक्षक पी.एस. मानकर, शीतल चौधरी व वनमजुर उपस्थीत होते…