श्रीकृष्णा व्हाट्सअप ग्रुपच्या वतिने शेतकऱ्यांसाठी पाणपाईचे लोकार्पण

समाजोपयोगी कार्यामुळे श्रीकृष्ण व्हाट्सअप ग्रुपचे शेतकऱ्यांनी मानले आभार

मूल (प्रतिनिधी): नेहमीच समोपयोगी कार्यासाठी पुढाकार घेणाऱ्या श्रीकृष्णा व्हाट्सअप ग्रुपच्या वतिने ग्रामीण परिसरात भाजीपाला उत्पादन करून मूल येथे विक्री करण्यासाठी आणलेल्या शेतकऱ्याची तृष्णा भागविण्यासाठी गुरूवारी सकाळी कोसंबी येथील वयोवृध्द शेतकरी इंदेश्वर मोहुर्ले हस्ते पाणीपाईचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष तथा ग्रुप ऍडमिन नंदकिशोर रणदिवे, माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, श्रीकृष्ण व्हाट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन इंजि. किशोर कापगते, जेष्ठ पत्रकार विजय सिध्दावार, भाजीपाला उत्पादक संघाचे नेते मंगेश पोटवार, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक भोजराज गोवर्धन, सामाजिक कार्यकर्ते श्याम उराडे, ओबीसींचे नेते राकेश ठाकरे, प्रमोद कोकुलवार, विलास कागदेलवार, गुरूदास गिरडकर, संतोष पालांदुरकर, शोध विचार वेध संस्थेचे गौरव शामकुळे आदी उपस्थित होते.

मूल तालुक्यात मोठया प्रमाणावर भाजीपाला उत्पादक शेतकरी राहत असुन केवळ भाजीपाला आणि शेती करून आपली उपजिका सदर शेतकरी करीत आहे, मूल येथील कर्मविर महाविद्यालयाच्या पटांगणावर सदर भाजीपाला उत्पादक शेतकरी स्वतःच्या शेतात उत्पादीत केलेला भाजीपाला विक्रीसाठी आणत असतात, मात्र याठिकाण शेतकऱ्यासाठी कुठेही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली नाही, ही बाब क्रिष्णा व्हाट्सअप ग्रुपचे ऍडमिन इंजि. किशोर कापगते यांना माहिती होताच त्यांनी पुढाकार घेत पाणपोई तयार करून शेतकरी इंदेश्वर मोहुर्ले यांच्या हस्ते पाणपाईचे लोकार्पण केले.

कार्यक्रमाचे संचालन मंगेश पोटवार यांनी केले, शेतकÚयासाठी प्रथमच पाणपाई उभारल्याबद्दल शेतकÚयांनी गु्रप अॅडमिनचे आभार मानले. यावेळी मोठया प्रमाणावर शेतकरी बांधव उपस्थित होते.