पाणपोई भागविणार नागरीकांची तृष्णा

साई मित्र परिवार आणि संस्कार कलश गृपच्या उपक्रमाला प्रारंभ

मूल (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासुन जिल्हयातील तापमानात प्रचंड वाढ झालेली असुन उन्हामुळे नागरीकांच्या अंगाची लाहीलाही होत असतानाच स्थानिक साई मित्र परिवार आणि संस्कार कलश ग्रुपच्या वतिने पाणपोईच्या माध्यमातुन नागरीकांची तृष्णा भागविणार असल्याने सदर दोन्ही उपक्रमशील संस्थेचे नागरीकांनी आभार मानले आहे.

चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असुन ब्लॉक सिटी म्हणुन प्रसिध्द आहे, दरवर्षीच चंद्रपूर जिल्हयाचा तापमान देशातील टॉप 10 मध्ये असते, यावर्षीही तापमानात प्रचंड वाढ झालेली असतानाही शासकीय कामे करण्यासाठी नागरीकांना दुरदुरून तहसील कार्यालय, पंचायत समिती, भुमी अभिलेख, सहकारी संस्थेच्या कार्यालयात व न्याय मंदीरात नेहमीच यावे लागते मात्र वेळोवेळी सोबत पाणी घेवुन येत नसल्याने पाण्यासाठीही नागरीकांना पैसे मोजावा लागत आहे, ग्रामीण भागातुन आलेल्या नागरीकांना थंडगार पाणी पिण्यास मिळावे यासाठी साई मित्र परिवाराचे अध्यक्ष तथा विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक विवेक मुत्यलवार आणि संस्कार कलश गु्रपच्या जयश्री चन्नुरवार यांच्या हस्ते तहसील कार्यालयाजवळ पाणपाईचे लोकार्पण महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधुन करण्यात आले. सदर लोकोपयोगी उपक्रमाचे नांगरीकांडुन स्वागत केल्या जात आहे.

यावेळी साई मित्र परिवारचे धनराज कुडे, संदीप मोहबे, बंडू साखलवार, पंकज महाजनवार, अमित राऊत, संदीप आलेवार, नाना कीर्तिवार, मुकेश गोवर्धन, रितिक पोगुलवार, नितीन अलगूनवार, मनीषा मुत्यलवार, प्रिया आलेवार, प्रियंका राऊत, कुमुदिनी भोयर, संस्कार कलश गु्रपच्या अध्यक्षा जयश्री मुस्तीलवार, उपाध्यक्षा श्वेता चिंतावार, सचिव सीमा बुक्कावार,कोषध्यक्ष संजीवनी वाघरे, कल्पना मेश्राम, सुजाता बरडे, मीनाक्षी छोणकर, वंदना बुक्कावार, प्रीती चिमड्यालवार उपस्थित होते.