विधवा परितक्ता महिलांना प्राधान्याने घरकुल द्या आम आदमी पार्टीची मागणी

सवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदन

मूल (प्रतिनिधी) : मूल पंचायत समिती अंतर्गत फिस्कुटी येथील ग्राम पंचायतीने पात्र घरकुल लाभाथ्याना डावलण्यांचे काम केले. विधवा परितक्ता महिलांना प्राधान्याने घरकुल देण्यांचे शासन निर्णय असतांनाही, घरकुलाचे अर्जदाराची यादी पाठवितांना विधवा परितक्ता महिलांचा विशेष उल्लेख न केल्यांने, या सर्व महिलांचे नांवे सामान्य यादीत आली आहे. त्यामुळे, अनेक वर्ष या महिलाना घरकुलाचे लाभापासून वंचित रहावे लागणार असून, विधवा व परितक्ता यांचेवरील हा अन्याय दूर करावा अशी मागणी आम आदमी पार्टीने पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी सुनिल कारडवार यांना दिलेला निवेदनातून केली आहे.

मूल तालुक्यातील फिस्कुटी येथील घरकुल वाटपात मोठा घोटाळा झाला आहे. पात्र लाभार्थाना घरकुले न देता, गावातील श्रीमतांना घरकुलाचा लाभ देण्यात येत असल्यांने, संतप्त झालेल्या विधवा परितक्ता महिलांनी आज मोठ्या संख्येत आम आदमी पार्टीच्या नेतृत्वात पंचायत समितीत कैफीयत मांडण्यास आल्या होत्या.

यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय सिद्धावार, तालुका अध्यक्ष अमित राउत, महिला अध्यक्षा कुमुदीनी भोयर, सामाजीक कार्यकर्ता छाया सिडाम, शितल वाडगुरे यांचेसह अन्यायग्रस्त विधवा परितक्ता महिला उपस्थित होत्या.

यादी तयार करण्यांत चूक झाल्यांचे संवर्ग विकास अधिकारी यांनी मान्य केले, यादीत दुरूस्तीचा प्रयत्न करणार असल्यांचेही त्यांनी यावेळी सांगीतले.
विधवा व परितक्ता महिलांना न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्यांचा इशारा आम आदमी पार्टीचे वतीने देण्यात आला आहे.