दुचाकीची समोरासमोर धडक : एक ठार, दोन जखमी

गंभीर जखमीना चंद्रपूर रेफर

कोरपना (प्रतिनिधी) : दुचाकीने जात असताना समोरा समोर झालेल्या अपघातात 1 जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना कोरपणा-गडचांदुर मार्गावरील माथा फाटयाजवळ मंगळवारी दुपारी 4 वाजता दरम्यान घडली. या अपघातात पुरूषोत्तम घनश्याम मुसळे वय 34 वर्षे रा. कळमना तालुका वणी हे ठार झाले, तर सोहेल शेख वय 18 वर्षे व उमेश पेंदोर वय 18 वर्षे रा. हातलोणी हे गंभीर जखमी झाले.

यवतमाळ जिल्हयातील वणी तालुक्यातील कळमना येथील पुरूषोत्तम घनश्याम मुसळे वय 34 वर्षे हे दुचाकी क्र. एम एम 29 क्यु 6254 ने कोरपणा कडे जात होतो तर सोहेल शेख आणि उमेश पेंदोर हे गडचांदुरकडे  हिरो पल्सर दुचाकी क्रं. 34 डी वाय 5204 ने जात असताना कोरपना गडचांदुर मार्गावरील माथा फाटाजवळ समोरासमोर अपघात झाला. यात पुरूषोत्तम घनश्याम मुसळे वय 34 वर्षे रा. कळमना तालुका वणी हे ठार झाले, तर सोहेल शेख वय 18 वर्षे व उमेश पेंदोर वय 18 वर्षे रा. हातलोणी हे गंभीर जखमी झाले. कोरपना पोलिसांनी घटनास्थळ गाठुन ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे जखमीना दाखल केले. मात्र जखमीची अवस्था अतिशय गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस करित आहे