मंत्री आले, पंचनामेही झाले, मात्र शेतकरी अजुनही नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत्र

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर विश्वास ठेवायचा कसा? शेतकऱ्यांचा सवाल

मूल (प्रतिनिधी) : सहा महिण्यापुर्वी तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले, अनेक शेतकऱ्यांचे उभे असलेले पिक पाण्यात भिजल्याने पिकासाठी लावलेला खर्च सुध्दा शेतकऱ्यांचा निघाला नाही, दरम्यान राज्याचे कृषी मंत्री नामदार दादाजी भुसे, जिल्हाचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार हे तालुक्यातील टेकाडी, चिमढा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचुन शेतकऱ्यांच्या पिकांची झालेली नुकसानीची पाहणी केले. आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्याना तात्काळ पंचनामे करून शासनाकडे पाठविण्याचे आदेश दिले, सदर घटनेला 6 महिण्यांचा काळ लोटुन गेला, मात्र अजुनही नुकसान भरपाई मिळाली नाही, पुन्हा किती दिवस शेतकऱ्याना प्रतिक्षाच करावी लागणार आहे, यामुळेच महाविकास आघाडी सरकार मधिल मंत्र्यांवर विश्वास ठेवायचा कसा असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.

मूल तालुका हा धानपिकाचा पट्टा म्हणुन परिचीत आहे, परिसरात पाहिजे त्याप्रमाणात रोजगाराचे साधन नाही, यामुळेच तालुक्यातील बहुतांष शेतकरी शेतात धानपिकाचे मोठया प्रमाणावर पिक घेतात आणि मिळाला रोजगार तर काम अन्यथा शेतात पिकविलेल्या धानाच्या आधारावर संपुर्ण वर्षभराचे नियोजन करून काही शेतकरी आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत असतात. मात्र माहे नोव्हेंबर मध्ये तालुक्यात आलेल्या मुसळधार व अवकाळी पावसामुळे शेतात उभे असलेले संपुर्ण पिकाचे नुकसान झाले, तालुक्यातील टेकाडी आणि चिमढा येथील एकाही शेतकऱ्याला घरी बरोबर धान नेता आले नाही, ही भिषण परिस्थिती महाविकास आघाडी सरकार मधील कृषी मंत्री असलेल्या नामदार दादाजी भुसे, जिल्हयाचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार, यांना माहिती झाल्याने त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेवुन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले, आणि अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानाची पाहणी केली,स

दर घटनेला 6 महिण्याचा कार्यकाळ लोटुन गेला, आता पिक पेरणीची वेळ आलेली आहे मात्र अजुनही शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेली नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही, अजुन किती काळ प्रतिक्षाच करायची असा सवाल शेतकरी करीत आहे,

अवकाळी पावसामुळे मूल तालुक्यातील शेत पिकाचे झालेल्या नुकसानीचे कृषी विभागामार्फत पंचनामे करून शासनाकडे पाठविले आहे, त्यासोबतच पिक विम्यासंदर्भात कंपन्याशी पत्रव्यवहार सुरूच आहे, शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळावी यासाठी कृषी विभाग प्रयत्नशिल आहे.
भाऊसाहेब बऱ्हाटे 
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

राज्याचे कृषीमंत्री नामदार दादाजी भुसे ज्या टेकाडी गावाच्या शेतशिवारात जावुन अतिवृष्टीची पाहणी केली, त्याच टेकाडी येथील युवा शेतकरी बालाजी कोटरंगे या 40 वर्षीय युवकाने अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीमुळे खाजगी घेतलेले कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत असतानाच घरीच गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना 2 जानेवारी रोजी घडली हे विशेष.