बल्लारपूर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या उपाध्यक्ष पदी संतोष निपुंगे

विसापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन शाखा बल्लारपूर तालुका उपाध्यक्ष पदावर विसापूर ग्रामपंचायत लिपिक संतोष निपुंगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या संदर्भात बामणी ( दुधोली ) येथील ग्रामपंचायत भवन कार्यालयात बल्लारपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण सभा शनिवारी पार पडली. यामध्ये अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन शाखा बल्लारपूर तालुक्याच्या अध्यक्षपदी रेखा देरकर, उपाध्यक्ष पदावर संतोष निपुंगे तर सचिव पदी वर्षा मांढरे यांची निवड करण्यात आली. युनियनच्या सदस्य पदी प्रेमकुमार गेडाम, अजय निंभाळकर, होमदेव कुळमेथे, गजानन मडावी यांची निवड करण्यात आली. बल्लारपूर तालुक्यात १७ ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उपाध्यक्ष संतोष निपुंगे यांनी दिले. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत उपस्थित कर्मचाऱ्यांनी केले. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन बल्लारपूर तालुका शाखा ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कठीबद्ध राहणार असून कर्मचाऱ्यांच्या हितासाठी संघर्ष करेल, असे आश्वासन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिले.