Home सावली विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी अनिल स्वामी तर उपाध्यक्ष पदी चरणदास...

विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी अनिल स्वामी तर उपाध्यक्ष पदी चरणदास बोम्मावार

लोकमत दुधे, सावली 
विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित सावली च्या संचालक मंडळाची निवडणूक पार पडली. यावेळी शेतकरी सहकारी पॅनल सर्व 13 संचालक निवडुन आले.

आज (दि 8) रोजी सदर संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक पार पडली. त्यात संस्थेच्या अध्यक्ष पदी अनिल स्वामी तर उपाध्यक्ष पदी चरणदास बोम्मावार यांची अविरोध निवड झाली. सदर निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक निर्णय अधिकारी मनीष जाधव यांच्या समक्ष पार पडली. अनिल स्वामी यांनी सलग दोनदा या संस्थेचे अध्यक्ष पद भूषविले हे विशेष.

यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित संचालक प्रशांत गाडेवार, प्रवीण सुरमवार, मंगल प्रधाने, मुरलीधर चौधरी, पराग सोनूले,डीलक्स डोहने, बोरकर, वामन भोपये, ईश्वर मोहूर्ले, लताताई आकुलवार, योगिता ताई गेडाम उपस्थित होते

error: Content is protected !!