मूल च्या दिव्या आणि विधी ची नागपूर येथे राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

मूल (प्रतिनिधी) : नागपूर येथे 12 जून रोजी भोसले सभागृह येथे राष्ट्रीय कराटे स्पर्धा पार पडली या स्पर्धेत कराटे अँड फिटनेस क्लब मूल (के.एफ.सी.एम.) च्या दोन खेळाडूंनी सहभाग घेत दमदार कामगिरी केली ज्यात दिव्या किशोर नरड हिला काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारात दोन सुवर्ण पदके तसेच विधी संजय कोटकोंडावार हिला काता प्रकरात सुवर्ण पदक तर कुमिते प्रकारात रजत पदक मिळविले.

सदर दोन्ही खेळाडू सलग होणाऱ्या स्पर्धेत कमालीचा प्रदर्शन करत अव्वल स्थान मिळवत पालकांचा तसेच के.एफ.सि.एम. चे मान वाढवत आहेत. येणाऱ्या काळात शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत या खेळाडूंकडून अश्याच उत्तुंग यशाची अपेक्षा ठेवत त्यांच्या तयारी वर आणखी लक्षपूर्वक भर देणार असल्याचे प्रतिपादन संचालक प्रशिक्षक इम्रान खान यांनी केले आहे. या विजयाने सर्व खेळाडूंचे कौतुक होत आहे.

खेळाडू कराटे अँड फिटनेस क्लब मूल मध्ये संचालक-प्रशिक्षक इम्रान खान व निलेश गेडाम यांच्या मार्गदर्शनात नियमित सराव करतात तसेच यांना सेन्सेई विनय बोढे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.