मूल नगर पालीकेचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

अवसे-नवसे-गवसेही लागणार कामाला

मूल (प्रतिनिधी) : काही दिवसावर होणाÚया मूल नगर पालीकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने मूल नगर पालीकेने प्रभाग आरक्षण जाहीर केलेे आहे. शासनाने मूल नगर पालीकेच्या नव्या प्रभाग रचनेला मान्यता दिली असुन या प्रभागातील राखव संवर्गाचे आरक्षण सोमवारी जाहिर करण्यात आले असुन 10 प्रभागामधुन 20 नगरसेवक निवडुण दयायचे आहेत.

नगर परिषदेच्या एकूण 20 जागापैकी 10 महिला आरक्षीत जागेत अनुसूचित जाती 2, अनुसूचित जमाती 1, सर्वसाधारण महिला 7 जागा आरक्षीत करण्यात आलेल्या आहेत. उर्वरित 10 जागापैकी अनुसूचित जाती 1, अनुसूचित जमाती 1 खुला सर्वसाधारण 8 जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. अनुसूचित जाती महिला राखीव मध्ये प्रभाग 8 अ, प्रभाग 9 अ, अनूसुचित जमाती महिला राखीव प्रभाग 1 अ, अनुसूचित जाती सर्वसाधारण 10 अ, अनुसूचित जमाती सर्वसाधारण प्रभाग 7 अ मध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्यात. सर्वसाधारण महिला राखीव प्रभाक 2 अ, प्रभाग 3 अ, प्रभाग 4 अ, प्रभाग 5 अ, प्रभाग 6 अ, प्रभाग 7 ब, प्रभाग 10 ब या प्रमाणे राखीव जागा ठेवण्यात आलेत.

सदर आरक्षण सोडतीला मूल नगर परिषदेचे प्रशासक तथा मूलचे उपविभागीय अधिकारी महादेव खेळकर, प्रभारी मुख्याधिकारी मनिषा वजाळे व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.