अतिवृष्टीत नुकसान झालेल्या गरजुना आमदार मुनगंटीवारांकडुन अन्नधान्याच्या किट्सची मदत

नागरीकांनी मानले आमदारांचे आभार

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यात सुरू असलेल्‍या अतिवृष्‍टीमुळे मुल शहरात अनेक घरांमध्‍ये अचानकपणे पाणी शिरले. यामुळे अन्‍नधान्‍य, वस्‍तुंचे प्रचंड नुकसान झाले. याचा आढावा त‍हसिलदार यांनी घेतल्यानंतर नागरिकांची प्रत्यक्ष पाहणी करून आमदार मुनगंटीवार यांना माहिती दिली, आमदार मुनगंटीवार यांनी तात्काळ नागरिकांना काही दिवस पुरेल अशा पध्दतीने अन्नधान्यांचे किट्स तयार करून वाटप करण्यास सांगीतले. सदर उपक्रमामुळे नागरीकांनी आमदार मुनगंटीवार यांचे आभार मानले.

बल्लारपूर विधान सभा क्षेत्राचे आमदार माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मूल येथील अतिवृष्टीची माहिती कळताच, त्यांनी स्‍वीय सहाय्यकांना मूल येथे पाठवुन नागरीकांना मदत करण्याच्या दृष्टीने आढावा घेण्यास सांगीतले. दरम्यान अतिवृष्टीमुळे अनेक नागरीकांच्या घरात पाणी शिरून अन्नधान्याचे नुकसान झाल्याचे दिसुन आले, सदर माहिती आमदार मुनगंटीवार यांना दिली, त्यांनी काही दिवस पुरेश अशा पध्दतीने अन्नधान्याच्या किटस गरजुना वाटप करण्यास सांगीतले, त्यानुसार अन्नधान्याच्या किट्स तयार करून नगर परिषदचे माजी उपाध्‍यक्ष नंदकिशोर रणदिवे, माजी नगरसेवक चंद्रकांत आष्टणकर, युवा मोर्चाचे राकेश ठाकरे, माजी नगरसेवक प्रशांत लाडवे, सामाजिक कार्यकर्ते विलास कागदेलवार ,अविनाश वरघटीवार, रवींद्र बरडे यांनी वाटप केले