भरधाव दुचाकीची शेतकऱ्याला धडक : तिन जण जखमी Accident

मूल तालुक्यातील घटना

मूल (प्रतिनिधी) :  मूल वरून आकापूरकडे जाणाऱ्या दुचाकी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आकापूरकडेच बैल घेवुन जाणाऱ्या आगडे नामक शेतकऱ्या ला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे जण जखमी झाल्याची घटना मूल पासुन 2 किमी अंतरावर घडली. Accident  आशिष गेडाम वय 22 वर्षे, गोलु वरखडे वय 22 वर्षे रा. आकापूर व शेतकरी आगडे हे जखमी आहेत.

आकापूर येथील आशिष गेडाम वय 22 वर्षे व गोलु वरखडे वय 22 वर्षे हे विना नंबरची दुचाकी घेवुन मूल आले होते, काम करून परत जात असताना मूल पासुन 2 किमी अंतरावर बैल घेवुन शेतावर जाणाऱ्या आगडे नामक शेतकऱ्याला धडक दिल्याने दुचाकी चालक आणि सोबत असलेला युवक जखमी झाला, without number bike तर शेतकरी आगडे हे जखमी झाले आहे. Three injured जखमीना मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.