घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू#Death of a woman

पती व मुलगी गंभीर जखमी

अनेकेश्वर मेश्राम, बल्लारपूर
मागील २० दिवसाअगोदर सलग पाऊस झाला. पावसामुळे दगड, माती, विटाचे कौलारू घर जीर्ण झाले. जीर्ण झालेले घर ध्यानीमणी नसताना कुटुंब गाढ झोपेत असताना रविवारी मध्यरात्री १२ वाजता घराची भिंत कोसळली. या दुर्दैवी घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर पती व ११ वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाले. बल्लारपूर येथील मौलाना आझाद वार्डात घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. विनिता योगेश पुणेकर (३६) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. Woman dies after house wall collapses

बल्लारपूर येथील मौलाना आझाद वार्डात योगेश पुणेकर वास्तव्याला आहेत. पत्नी विनिता व मुलगी सोनू असे गरीब कुटुंब. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. घरची परिस्थिती बेताची. त्यामुळे निवारा म्हणून दगड, माती, विटाचे कौलारू घर बांधले. त्या घरी त्यांचा गरिबीचा, पण सुखी संसार होता. मात्र रविवारची रात्र त्यांच्या संसारात काळ म्हणून आली. कुटुंब गाढ झोपेत असताना जीर्ण झालेली घराची दगड, मातीची भिंत कुटुंबियांवर कोसळली.यात विनिता जागीच गतप्राण झाली. तिचा पती योगेश पुणेकर (३९) व मुलगी सोनू पुणेकर (११) हे गंभीर जखमी झाले. शेजाऱ्यांनी धावपळ करून जखमीना ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे उपचारासाठी दाखल केले. Husband and daughter seriously injured

या दुर्दैवी घटनेत विनिताचा बळी गेल्याने वार्डात हळहळ व्यक्त केली जात आहे. शासनाने योगेश पुणेकर यांच्या कुटुंबाला मदत करून दिलासा द्यावा, असी मागणी नागरिकांनी केली आहे.