हर घर तिरंगा अभियाना निमित्य तिरंगा सन्मान रॅली

सुधाकर दुधे, सावली
स्वतंत्र भारत देशाचे हे ७५ वे वर्ष ‘‘अमृत महोत्सवी वर्ष’’ म्हणून अवघ्या देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी सावली नगर पंचायतच्या वतीने 8 ऑगष्ट पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्याचाच एक भाग म्हणून नगर पंचायत सावली, पंचायत समिती सावली, तहसील कार्यालय सावली आणी पोलीस स्टेशन सावली यांचा संयुंक्त विद्यमानाने 10 ऑगष्ट रोजी तिरंगा सन्मान बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते,

सावली नगर पंचायतच्या वतिनेे ‘‘हर घर तिरंगा’’ अभियानाचा भाग म्हणून प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावावा यासाठी अमृत महोत्सव अभियानाअंतर्गत सावली शहरात जनजागृती निमीत्त बाईक रँलीचे आयोजन करण्यात आलेले होते.

स्वातंत्र्य लढ्याच्या स्मूर्ती तेवत राहाव्यात यासाठी ८ ते १७ आगस्ट दरम्यान हर घर तिरंगा राबविण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम व पर्यावरण संवर्धनाची आवड निर्माण व्हावी तसेच चित्रकला ,निबध, वृक्षारोपण खादि कापडबाबत जनजागृती, श्रमदान व स्वच्छता अभियान, प्रभाग निहाय भेट असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत

सावली शहरातील सर्व नागरिकांना घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. या वेळी सावलीचे तहसीलदार परीक्षित पाटील, नायब तहसीलदार  सागर कांबळे , पंचायत समिती सावलीच्या संवर्ग विकास अधिकारी श्रीमती मरस्कोल्हे, नगर पंचायत सावलीच्या नगराध्यक्षा  लताताई लाकडे , उपनगराध्यक्ष  संदीप पुण्यपकर तसेच सर्व नगरसेवक आणी नगरसेविका आणी पंचायत समिती सावली, तहसील कार्यालय, नगर पंचायत सावली व पोलीस स्टेशन सावली चे सर्व अधिकारी-कर्मचारी वर्ग व तसेच सावली शहरातील नागरिकांनि या वेळी मोठ्या प्रमाणात  उपस्थिती दाखवत “हर घर तिरंगा ” या उपक्रमाला अधिक बळकटी दिली. त्या बदल नगर पंचायत सावलीच्या नगराध्यक्षा लताताई लाकडे यांनी आभार मानले.