पाच वर्षीय चिमुकलीवर 30 वर्षीय नराधमाकडुन लैंगिक अत्याचार

नराधमावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी) : खुल्या पंटागणात खेळत असलेल्या एका पाच वर्षीय चिमुकलीवर एका 30 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील वांद्रा गावात घडली. युवराज बळीराम मेश्राम असे नराधमाचे नांव असुन तो वांद्रा येथील रहिवासी आहे.

ब्रम्हपुरी तालुक्यातील वांद्रा येथील गुरूकुंज आश्रम जवळील प्रांगणात असलेल्या कडुनिंबाच्या झाडाखाली काही लहान मुली खेळत होत्या. यावेळी युवराज बळीराम मेश्राम हा नराधम त्याठिकाणी आला आणि खेळत असलेल्या एका पाच वर्षीय चिमुकलीला घेवुन गेला व तिच्यावर अत्याचार केला, दरम्यान इतर खेळत असलेल्या मुली घाबरून घरी पडुन गेल्या. गुरूकुंज आश्रमालगत असलेल्या पानटपरीवर पिडीत चिमुकलीचे वडील होते. चिमुकलीच्या ओरडण्याचा आवाज आल्याने वडिल चिमुकलीकडे धावत गेले. त्याठिकाणीच नराधम चिमुकली सोबत होता.

सदर घटनेची माहिती वांद्राचे पोलिस पाटील भाऊराव पाल यांना देण्यात आली. आणि मेंडकी पोलिसाना पाचारण करून आरोपीला अटक करण्यात आली. चिमुकलीला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. तपासाअंती युवराज नामक नराधमाने अत्याचार केला हे सिद्ध झाल्याने आरोपीला अटक करून कलम ३७६ ए, बी आय पी सी कलम ६ आणि १०, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक स्वाती फुलेकर करीत आहे.