मतदारांनी आधार कार्ड ओळखपत्रसोबत जोडावे – कांचन जगताप

प्रत्येक मतदान केंद्राचा घेतला जात आहे आढावा

बल्लारपूर (प्रतिनिधी) : निवडणूक आयोगाने मतदान कार्ड सोबत आधार लिंक करण्याचा निर्णय घेतला.यामुळे अद्यावत मतदार यादी प्रामाणिकरण होणार आहे. मतदार यादीत आधार लिंक मुळे दुबार नावे वगळणे सोपे होणार आहे. बल्लारपूर तालुक्यातील केंद्र निहाय आधार लिंक प्रक्रियेचा आढावा घेतला जात आहे. यावेळी प्रत्यक्ष भेट दिली जात असून मतदारांनी मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्यांचे आव्हान बल्लारपूर येथील तहसीलदार डाँ. कांचन जगताप यांनी विसापूर येथील मतदारांना केले आहे.

बल्लारपूर तालुक्यात नगरपालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात १७ ग्रामपंचायत आहे. बिएलओ मार्फत प्रत्येक मतदारांचे मतदान कार्ड आधार लिंक करण्याची मोहीम सुरु झाली आहे. या अनुषंगाने तहसीलदार डाँ. कांचन जगताप यांनी शनिवारी विसापूर येथील जि. प. शाळा मतदान केंद्राला भेट दिली. किती मतदारांची नावे मतदान कार्ड सोबत लिंक करण्यात आली, याचा बिएलओ कडून आढावा घेतला. ग्रामपंचायत उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांना ग्रामपंचायत मार्फत या मोहिमेला सहकार्य करण्याचे निर्देश दिले. सुट्टीचा दिवस असून देखील राष्ट्रीय कार्यात आपला तालुका मागे राहू नये म्हणून तहसीलदार डाँ. जगताप यांची भेट कार्यत्पतरता दर्शविणारी ठरली.

बल्लारपूर तालुक्याच्या मतदार यादीतील संपूर्ण दुबार नावे वगळली जाऊन अद्यावत मतदार यादी व्हावी. प्रत्येक मतदारांनी मतदान कार्ड सोबत आधार क्रमांक लिंक करावा. मतदार यादीतील घोळ कायम स्वरूपी संपुष्टात यावा. यासाठी मुख्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही मोहीम राबवली जात आहे. बल्लारपूर शहरातील सर्वच मतदान केंद्रावर व ग्रामीण भागात देखील १७ ग्रामपंचायत मध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर आधार लिंक मोहीम सुरु झाली असून सर्वच मतदारांनी ३१ ऑगस्ट पर्यंत आपले मतदान कार्ड सोबत आधार लिंक करून प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती बल्लारपूर येथील तहसीलदार डाँ. कांचन जगताप यांनी केली आहे. यावेळी विसापूर मतदान केंद्रावरील बिएलओ कल्पना मिलमिले, वडस्कर, जीवने, पुणेकर, तहसीलचे लिपिक कुणाल सोनकर, विसापूर चे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांच्यासह मतदार उपस्थित होते.