युवा शेतकऱ्यांने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या#suicide

रविवार पासुन होता बेपत्ता

पोंभूर्णा (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसापासुन तालुक्यात मोठया प्रमाणावर पाउस पडला, यापावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाला फटका बसला, यामुळे हताश होवुन एका युवा शेतकऱ्यांने विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील सोनापूर येथे 28 ऑगष्ट रोेजी उडघकीस आली. ज्ञानेश्वर वामन गौरकार वय 32 वर्षे असे आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याचे नांव आहे. सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. Incident at Sonapur in Pombhurna taluka

पोंभूर्णा तालुक्यात सोनापूर येथील ज्ञानेश्वर वामन गौरकार वय 32 वर्षे हा रविवार पासून बेपत्ता होता. तो घरी आला नसल्यामुळे त्यांची शोधाशोध सुरू होती. सोमवारला त्याचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी यांचे मार्गदर्शनात पोलिस अंमलदार राजकुमार चौधरी करीत आहे. Farmers were frustrated due to continuous rains

त्याच्या पश्चात आई ,वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आहे.

तालुक्यात सततधार पावसामुळे हाती आलेले पिक गेल्याने तो निराश असल्यानेच तो टोकाचे पाउल उचलल्याची चर्चा परिसरात आहे.