पिंपळनेरी पेठ येथील घटना
चिमूर (प्रतिनिधी) : गेल्या महिण्यात सततधार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे उभे पिक वाहुन गेले, यामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी यावर्षी निरासा पदरी पडत आहे, दरम्यान तालुक्यातील पिंपळनेरी पेठ येथील शेतकऱ्यांने शेतशिवरात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी 3 सष्टेंबर रोजी घडली. विजय दादाजी रोकडे वय 58 वर्षे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नांव आहे.A farmer from Pimpalneri Peth
चिमूर तालुक्यात मागील महिण्यात जोरदार पाउस आल्याने छोटे मोठे नाले तुडुंब भरून वाहू लागली. नदी नाल्यांच्या परिसरात महापुर आला. त्यामुळे शेतात लागवड करण्यात आलेले उभे पिक मोठ्या प्रमाणात नष्ट झाले. तालुक्यातील पिंपळनेरी पेठ येथील शेतकरी विजय दादाजी रोकडे यांची स्वतःची 6 एकर शेतजमीन आहे. तसेच गावातील काही लोकांची शेतजमीन ठेक्याने करतात. यावेळी त्यांनी स्वतः व ठेक्याच्या शेतात धान, कापूस पिकाची लागवड केली होती, परंतु त्यांचे शेतजमीन नाल्यालगत असल्याने महापुराने संपूर्ण पीक उध्वस्त झाले. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याने शासनाने नुकसान भरपाई घोषित केली. नुकसानीचे पंचनामे झाले, परंतु शेतकऱ्यांच्या पदरात अद्याप कोणतीही मदत पडलेली नाही. The flood destroyed the entire crop
शेतकरी रोकडे यांचे नुकसान झाले तेव्हापासून ते चिंताग्रस्त जीवन जगत होते. आज शनिवारी त्यांनी शेतातील पीक नष्ट झाल्याच्या कारणाने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केले. यावेळी महापुरामुळे शेतातील नष्ट झाले तर दरवर्षी कोणते न कोणते संकट शेतकऱ्यावर येत असल्याने उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. रोकडे यांच्या उत्पादनात ही घट झाल्याने त्यांना दरवर्षीच नुकसान सहन करावे लागत होते. यामुळे शेती कसण्यासाठी देण्यात आलेले कर्ज, हात उसने घेतलेले पैसे चुकते करण्यास या शेतकऱ्याला अडचणीचे ठरत होते. त्यामुळे त्या शेतकऱ्याने जिवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.