अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरर्णी भाजपा पदाधिकाऱ्याला अटक

पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बल्लारपूर (प्रतिनिधी) :  येथील महाराणा प्रताप वार्डात एका कम्प्यूटर इन्स्टिटयूट मध्ये नवव्या वर्गातील विद्यार्थीनी शिकवणीला येत होती. ही संस्था एका भाजपा पदाधिकाऱ्याची आहे. यासंस्थेत त्या अल्पवयीन १३ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना ३० आगस्ट रोजी घडली. मात्र विनयभंग करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास चालढकल केली. मात्र जण रेट्यामुळे अखेर त्या पदाधिकाऱ्यावर बल्लारपूर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. संजय वाजपेयी वय 46 वर्षे असे अटकेतील आरोपीचे नाव असून तो बल्लारपूर शहर भाजपाचा सचिव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे.

बल्लारपूर शहर भाजपाचे सचिव संजय वाजपेयी यांचे महाराणा प्रताप वार्डात संगणक प्रशिक्षण संस्था आहे. या संस्थेत पीडित १३ वर्षाची मुलगी प्रशिक्षणासाठी नेहमी येत होती. अशातच ३० ऑगस्ट रोजी संगणक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणार्थी विद्यार्थी कमी होते. याच संधीचा फायदा घेत संजय वाजपेयी याने पीडित मुलीसोबत एकांतात बोलावून अश्लील चाळे करून विनयभंग केला. या प्रकारने घाबरून पीडित मुलीने घराकडे पळ काढला. ही आपबीती घरी पालकांना सांगितली. काही वेळात पालकांनी मुलीची आपबीती एकूण प्रशिक्षण केंद्र गाठले. याची कुणकुण संजयला लागताच, त्याने संस्था बंद करून पळ काढला. दरम्यान वार्डातील नागरिकांनी त्याला वाटेत पकडून चोप दिला. घृणास्पद कृत्य केल्या बद्दल नागरिकात रोष निर्माण झाला.पीडित मुलीचे पालक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास जात असताना काही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पीडितेच्या पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.पोलिसात तक्रार केल्याने मुलीची बदनामी होईल, म्हणून मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.पीडितेच्या पालकांना आमिष देण्यापर्यंत मजल मारली. मात्र वार्डातील नागरिक संजयच्या कृत्यामुळे संतप्त झाले. सर्व प्रकारचा दबाव झुगारून पीडित मुलीच्या सोबत आले. परिणामी नागरिकांच्या दबावामुळे बल्लारपूर पोलीस ठाण्यात तीन दिवसानंतर अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी पोक्सो कायद्यानव्ये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

संभाजी ब्रिगेडची कठोर करावाईची मागणी
बल्लारपूर येथील वाजपेयी कम्प्यूटर संस्थेचे संचालक संजय वाजपेयी यांनी माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. संस्थेत प्रशिक्षणाला येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे भावी आयुष्य उधवस्त केले. राजकीय संरक्षण प्राप्त असल्यामुळे त्याची हिंमत वाढली. यामुळे वार्डातील नागरिकात असंतोष निर्माण झाला आहे. पुन्हा असा घृनीत प्रकार घडू नये. यासाठी सदर संगणक प्रशिक्षण संस्था बंद करावी. पीडित मुलीला न्याय मिळावा. यासाठी पोलीस प्रशासनाने संजय वाजपेयी याचेवर कठोर कारवाई करावी. यासंदर्भात संभाजी ब्रिगेडच्या वतीने पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना निवेदन सादर केले. ऍड राजेश लिंगे यांच्या नेतृवातील प्रतीक वाटेकर, रोहित चुटे, संकेत चौधरी, अमीर शेख, चेतन मुळे, निखिल वडस्कर, पवन राजगडे, गणेश मसराम यांच्या शिष्टमंडळाने पोलिसांना निवेदन सादर करून कठोर कारवाईची मागणी केली.