अभाविप व शिक्षण मंचच्या उमेदवारांना विजयी करा : दिलीप मॅकलवार

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली निवडणूक

चंद्रपूर (प्रतिनिधी) : गोंडवाना विद्यापिठाच्या सिनेट सदस्य पदांची निवडणुक येत्या 4 सप्टेंबर रोजी होवु घातलेली आहे, सदर निवडणुकीत उभे असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंचच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतानी विजयी करण्याचे आवाहन महाराष्ट राज्य शि. प. चंद्रपूरचे सहकार्यवाह दिलीप मॅकलवार यांनी केले आहे.

नोंदणीकृत पदवीधर मतदार संघातील मतदारांनी ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अधिसभा (सिनेट) निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंच तर्फ खुल्या प्रवर्गातील व राखीव प्रवर्गातील सर्व उमेदवारांना प्रथम पसंतीचे मतदान करून बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन दिलीप मॅकलवार यांनी केले आहे