तस्करांचे धाबे दणाणले
कोरपना (प्रतिनिधी) : वाहतुक नियंत्रण करीत असताना एक वाहन संशयास्पद जाताना दिल्याने वाहतुक पोलीसांनी सदर वाहनाची झडती घेतली असताना त्याठिकाणी सुगंधीत तंबाखु आढळुन आल्याने पोलीसांनी सदर साठा जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना कोरपना-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कन्हालगाव फाटा येथे गुरूवारी घडली.
वाहतूक पोलिसांनी वाहतूकीवर नियंत्रित ठेवताना महेंद्र पिक अप क्रं. एम एच 29 बी डी 0506 हे वाहन संशयास्पद जात असताना पोलीसांनी तिचा पाठलाग करून वाहनाची झडती घेतली असता त्यात सुगंधी तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. हा साठा कोरपना पोलिसांनी जप्त केला आहे. सदर साठा एक लाख नऊ हजार सातशे सत्तर रोख किमतीचा आहे. याप्रकरणी आकाश चंदू लभाने, अर्जुन कवडू येटे रा. वडजापूर ता. वणी यांच्यावर भांदवी कलम ३२8, २७२, २७३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी प्रभाकर जाधव, नामदेव पवार, बलविंद सिंग यादव यांनी कारवाई केली.