गणेशोत्सव निमीत्य मूल पोलीसांचा रूट मार्च

अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याच्या उद्देशाने मूल पोलीस स्टेशनच्या वतिने पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली 4 सप्टेंबर रोजी मूल शहरात रूट मार्च काढण्यात आले.

आगामी गणेशोत्सव निमीत्य कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने मूल शहरातील तेली मोहल्ला, ढीवर मोहल्ला, कृषी उत्पन्न बाजार समिती, शिख मोहला, जुना रेल्वे स्टेशन, गांधी चौक, बस स्टॉप, सोमनाथ मार्ग यासह शहरातील मुख्य मार्गाने व गर्दीचे ठिकाण, मिश्र वस्ती आणि संवेदनशील भागातून मूल पोलीस स्टेशनच्या वतिने रूट मार्च काढण्यात आले.

सदर रूट मार्च मध्ये ६ अधिकारी ३५ अंमलदार, एस आर पी एफ विभाग 1, आर सी पी १ अधि, १९ अंमलदार व सैनिक २४ सहभागी झाले होते.