वामनराव गड्डमवार समाजाला दिशा दाखवणारे प्रेरक व्यक्तीमत्व- आ. विजय वडेट्टीवार

मूल (प्रतिनिधी) : समाजाला दिशा दाखविणारे व प्रेरक व्यक्तीमत्व राहीलेले वामनरावजी राज्याच्या राजकारणात समर्पीतपणाची छाप पाडणारे लोकनेते होते, समाजाचे देण महत्वाचे समजून समाजाचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थ कार्य करून जिल्हयाचे नांव राज्याच्या नकाशावर कोरून ठेवले असे मत माजी मंञी आ. विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

स्थानिक भारत शिक्षण प्रसारक मंडळ आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावलीच्या वतीने आयोजीत स्व. वामनराव गड्डमवार यांच्या जयंती निमित्य आयोजीत गुणवंत विद्यार्थी अभिनंदन, माजी विद्यार्थी गौरव आणि प्रगतशील शेतकरी सत्कार सोहळया प्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे सचिव राजाबाळ संगीडवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाला माजी आमदार देवराव भांडेकर, नगराध्यक्ष लता वाळके, जि.प.माजी सभापती दिनेश चिटनुरवार, मध्यवर्ती बॅंकेचे संचालक डाॅ. विजय देवतळे, संजय तोटावार, शिक्षण संस्थाचालक संघाचे अध्यक्ष डाॅ. अनिल शिंदे, गोंडवाना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुर्यकांत खनके, डाॅ. पंजाबराव देशमुक कृषी महाविद्यालय मूल येथील डाॅ. रमाकांत गजभीये, अँड. दिपक चटप, नगरसेवक नंदु नागरकर आणि संस्थाध्यक्ष संदीप गड्डमवार आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि वामनराव गड्डमवार यांच्या प्रतिमांना अभिवादन करून झाली. प्राचार्य डाॅ. अशोक खोबरागडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय मूल येथील फलोद्यान विभाग प्रमुख डाॅ. रमाकांत गजभीये यांनी बदलती पिक परिस्थिती आणि वातावरणानुसार शेतक-यांनी विकसीत पध्दतीचा अवलंब करून शेतक-यांनी परंपरागत शेतीसह फळांचे उत्पादन घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहन केले, युवकांचे आदर्श आणि अमेरीकन शिष्यवृत्ती प्राप्त युवा अधिवक्ता अँड. दिपक चटप यांनी युवकांनी ध्येय समोर ठेवून त्याच्या प्राप्तीसाठी प्रामाणीक प्रयत्न केल्यास विजयाची पायरी सहज गाठता येईल. असा विश्वास दिला.

यावेळी नगराध्यक्ष लता वाळके आणि माजी आमदार देवराव भांडेकर यांनी मनोगत व्यक्त करतांना वामनराव गड्डमवार यांच्या व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकला. स्व. वामनराव गड्डमवार जयंती निमित्याने संस्था आणि महाविद्यालयाच्या वतीने तालुक्यातील प्रगतशील शेतकरी गुरूदास घुबडे (निफंद्रा) आणि मधुकर बोरकर (मुंडाळा) यांचेसह महाविद्यालयातील गुणवंत व माजी विद्यार्थ्यांचा आ. विजय वडेट्टीवार यांचे हस्ते सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यांत आला. कार्यक्रमात आ. विजय वडेट्टीवार यांचा संस्थेच्या वतीने संस्थाध्यक्ष संदीप गड्डमवार आणि सचिव राजाबाळ संगीडवार यांनी सन्मानचिन्ह देवून गौरव केला. मार्गदर्शक डाॅ. रमाकांत गजभीये, अँड. दिपक चटप, माजी आमदार देवराव भांडेकर, नगराध्यक्ष लता वाळके आणि उपाध्यक्ष संदीप पुण्यपवार यांचे प्रती आ. वडेट्टीवार यांचे हस्ते सन्मानचिन्ह देवून कृतघ्नता व्यक्त केली.

कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार, मोतीलाल दुधे, मनोहर ठाकरे, काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन गोहणे, माजी अध्यक्ष राजेंद्र सिध्दम, महिला अध्यक्षा उषा भोयर, जि.प.माजी सदस्य पांडुरंग तांगडे, लक्ष्मण धोबे, विजय टोंगे, निनाद गड्डमवार, प्रशांत गाडेवार यांचेसह संस्थेचे उपाध्यक्ष अनिल स्वामी, कोषाध्यक्ष डाॅ. विजय शेंडे, सल्लागार संजय गड्डमवार, संचालक गोपाल झोडे, अजय गड्डमवार, सुनिल बल्लमवार, सुनिल नरेड्डीवार यांचेसह तालुक्यातील काॅंग्रेस कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठया संख्येनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डाॅ. राजश्री मार्कंडेवार आणि डाॅ. रामचंद्र वासेकर यांनी केले. डाॅ. दिलीप कामडी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

लोकनेते वामनराव गड्डमवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य महाविद्यालयाच्या वतीने जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यांत आले होते. आ. विजय वडेट्टीवार यांचे हस्ते प्रारंभ झालेल्या रक्तदान शिबिरात ४० विद्यार्थ्यांनी रक्तदान केले