मूल शहरात गणरायाला शांततेत निरोप

मूल (प्रतिनिधी) : ढोल ताशाच्या गजरात मूल येथील गणरायाला शनिवारी रात्रौ निरोप देण्यात आला, यावर्षी मोठया धुमधडाक्यात गणरायाचे आगमन झाले आणि पाहता पाहता निरोपही देण्यात आला, मूल येथील 19 मंडळाने गणरायांला हजारो नागरीकांच्या साक्षीने शहरातील मध्यभागी असलेल्या तलावामध्ये शेवटचा निरोप देण्यात आला, यावेळी कोणतीही अनुसूचित घटना घडु नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी मलिकाअर्जुन इंगडे, पोलीस निरीक्षक सतिषसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवलेला होता.

मूल शहरात बाप्पाचे आगमण होताच सगळीकडे आनंदाचे वातावरण असते, ग्रामीण भागातील हजारो नागरीक मूल येथील गणेश मंडळाने सजविलेले देखावे पाहण्यासाठी गर्दी करीत असतात, यावर्षी बाप्पाचे आगमण झाले आणि पावसाला सुरूवात झाली, गणेशाचे आगमण शेतकÚयांसाठी वरदान ठरले म्हटले तर वावगे ठरणार नाही. मूल शहरात 19 गणेश मंडळाने गणरायाची प्रतिष्ठापना केली, अनंत चतुर्थीला 4 गणेष मंडळाने तर शनिवारला 15 गणेश मंडळानी हजारो नागरीकांच्या साक्षीने गणरायाला अखेरचा निरोप दिला.

यावेळी बाप्पांना विसर्जीत करण्यासाठी भोई समाजातील नागरीकांची मदत घेण्यात आली, यामुळे मूलच्या गणरायाने यावर्षीही शांततेत निरोप घेतला, मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी मलिकाअर्जुन इंगडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता, मूल येथील गांधी चौकात पैंडाल टाकण्यात आले होतेे, गांधी चौक ते बाजार चौक, विश्राम गृह मार्ग तसेच मुख्य मार्गावर नागरीकांची अफाट गर्दी पाहायला मिळाली, नागरीकांना मार्ग काढुन देण्यासाठी वसुधंरा पथकाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मलिकाअर्जुन इंगळे, मूल नगर पालीकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर, नायब तहसीलदार यशवंत पवार, मूल नगर पालीकेचे प्रशासकीय अधिकारी विनोद येनुरकर उपस्थित होते.