नागरीकांचे समाधान होणे महत्वाचे : अजय पाटणकर

नगर पालीकेचा 35 वा वर्धापण दिन उत्साहात साजरा

मूल (प्रतिनिधी) : नगर पालीका क्षेत्रातील नागरीकांच्या समस्या तात्काळ सोडविण्याला आपण प्रथम प्राधान्य देणार आहे, रूजु होण्यापुर्वी शहरात अनेक विकासात्मक कामे झालेले आहेत, तरीही अनेक विकासात्मक कामे करण्याची संधी मला आहे, हे करण्यासाठी नगर पालीकेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य करण्याची आवश्यकता असुन नागरीकांचे काम पुर्ण होणे महत्वाचे असल्याचे मत मूल नगर पालीकेत नव्याने रूजु झालेले मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी व्यक्त केले. ते नगर पालीकेच्या 35 व्या वर्धापण दिनानिमीत्य बोलत होते.

मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांची बदली झाल्यानंतर मूल नगर पालीकेचा पदभार सावलीच्या मुख्याधिकारी मनिषा वजाळे यांच्याकडे सोपविण्यात आला होता, अनेक दिवसानंतर मूल नगर पालीकेला ‘‘प्रभारी’’चा लागलेला शिक्का गायब झालेला असुन गोंदिया जिल्हातील देवरी येथील नगर पालीकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांची मूल नगर पालीकेचे मुख्याधिकारी म्हणुन बदली झाली असुन ते मूल नगर पालीकेत नुकताच रूजु झाले आहेत.

दरम्यान मूल नगर पालीकेचा वर्धापण दिन 10 सप्टेंबर रोजी नगर पालीकेने आयोजीत केला होता, यावेळी केक कापुन वर्धापण दिन साजरा करण्यात आला. 1987 साली स्थापन झालेल्या मूल नगर पालीकेचे सुरूवातीचे 4 वर्षे हे प्रशासकानी चालविले, त्यानंतर 1991 साली मूल नगर पालीकेची प्रथम निवडणुक झाली आणी प्रथम नगराध्यक्ष म्हणुन धनजीभाई शहा यांनी पदभार स्विकारला, त्यानंतर अनेकांनी नगराध्यक्ष पद स्विकारले. मात्र गेल्या 5 ते 6 वर्षात मूल नगरांचा न भुतो न भविष्यती असा विकास झालेला आहे. असा सुर वर्धापण दिनानिमीत्य आयोजीत कार्यक्रमात नगर पालीकेचे प्रशासकीय अधिकारी विनोद येनुरकर, पाणी पुरवठा अभियंता श्रीकांत समर्थ, पत्रकार अशोक येरमे, विनायक रेकलवार यांनी व्यक्त केले.

यावेळी मूल नगर पालीकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी मूल शहरातील समस्या सोडविण्यास कटीबध्द असुन त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे सांगत मूल शहरातील वाढते अतिक्रमण, डुक्कराचा वाढता हैदौस, बेवारस जनावरांवरे रस्त्यावर बसण्यापासुन प्रतिबंध यासह विविध विषयावर यावेळी विस्तृत चर्चा करण्यात आली.

वर्धापण दिनाच्या निमीत्याने मूल नगर पालीकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी अजय पाटणकर यांचे मूल तालुका पत्रकार संघाचे वतिने स्वागत करण्यात आले, यावेळी पर्यावरण दुत राहुल आगडे यांना वृक्षभेट देवुन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन आरोग्य निरीक्षक अभय चेपूरवार यांनी केले. यावेळी पत्रकार राजु गेडाम, गुरूदास गुरूनुले, भोजराज गोवर्धन, रविंद्र बोकारे यांचेसह नगर पालीकेचे कर्मचारी, अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.