लम्पीची साथ: गायीचे दूध आता प्यायचे का ?

चिमूर (प्रतिनिधी) : पाळीव जनावरांवर मागील काही दिवसांपासुन लम्पी त्वचारोगाचा आजार वाढत आहे, यामुळे अनेक तर्कवितर्क काढल्या जात असल्याने नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे, याबाबत पशुसंवर्धन विभागाने नागरीकांमधील भिती दुर केली आहे.

पाळीव जनावरांमध्ये लम्पी त्वचारोगाचा आजार बळावत आहे. गायीचे दूध प्यावे की नाही, याबाबत संभ्रम आहे. मात्र, घरी आलेले दूध उकळून पिल्यास या आजाराचा धोका नसल्याचा निर्वाळा पशुवैद्यकीय अधिकाÚयांनी दिलेला आहे. हा आजार जनावरांपासून दुसÚ़्या जनावरास होऊ शकतो, मात्र मानवास हा आजार होत नसल्याचे सांगण्यात आले आहे.

लम्पीची लागण झाली तर दूध चांगलेच : डॉ. श्रध्दा राऊत
दुध डेअरीमध्ये उच्च तापमानावर तापविले जाते. त्यामुळे विषाणू असण्याचा प्रश्नच नाही. तबेल्यातून थेट दूध घरी येत असेल तर उकळून घ्यावे, त्यामुळे दूध पिण्यातून कोणताही धोका संभवत नाही. हा आजार जनावरांमधून मानवामध्ये संक्रमित झालेला नाही किंवा तसे कुठेही आढळून आलेले नसल्याचे चिमूर येथील पशुसंवर्धन अधिकारी डॉ. श्रध्दा राऊत यांनी सांगितले.

अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई : मनोज गभने
लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव माणसांना होत नाही. तरीही उलटसुलट चर्चा होत आहे. या आजाराबाबत वॉटस् अॅप, फेसबुक द्वारे कुठल्याही प्रकारच्या अफवा पसवू नयेत, असा ईशारा पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी दिला आहे.