व्हाईस ऑफ मिडीयाच्या जिल्हाध्यक्षपदी संजय पडोंळे

मूल (प्रतिनिधी) : पत्रकारांच्या आणि पत्रकारितेच्या सर्वागिण विकास करण्याच्या दृष्टीने व्हाईस ऑफ मिडीयाच्या जिल्हाध्यक्षपदी मूल तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय पडोळे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. व्हाईस ऑफ मिडीयाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक यांनी श्री. पडोळे यांची नियुक्ती केली अहे.

पत्रकारितेच्या जीवावर या सृष्टीचा डोलारा चालतो, ती पत्रकारिता शाबुत राहावी, सुरक्षित राहावी यासाठीच व्हाईस ऑफ मिडीया काम करणार आहे, त्यासाठी जिल्हयातील सर्व तालुक्यात 11 सदस्यांची तर जिल्हयाच्या ठिकाणी 21 जणांची कार्यकारिणी गठीत करून कामास गती देण्यासाठी नवनियुक्त अध्यक्ष संजय पडोळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सदर नियुक्तीबद्दल व्हाईस ऑफ मिडीयाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, विदर्भ विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, कॉंग्रेसचे मुल तालुकाध्यक्ष गुरूदास गुरूनुले, मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक येरमे, माजी अध्यक्ष प्रा. चंद्रकांत मनियार, माजी सचिव राजु गेडाम, विनायक रेकलवार, डिजीटल मिडीया असोशिएशनचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष विजय सिध्दावार, दे धक्का एक्सप्रेसचे मुख्य संपादक तथा विविध कार्यकारी सहकारी संस्था मूलचे संचालक भोजराज गोवर्धन, कार्यकारी संपादक तथा प्रकाशक मंगेश पोटवार यांनी अभिनंदन केले.