सर्पदंश झालेल्या संतोषचे अखेर उपचारादरम्यान मृत्यु

मूल तालुक्यतील चिमढा येथील घटना

मूल (प्रतिनिधी) : मजुरीचे काम करण्यासाठी शेतावर गेलेल्या संतोषला एका विषारी सापाने दंश केल्याने तो चंद्रपूर येथे उपचार घेत असताना आज (दि. 16 नोव्हेंबर) रोजी पहाटे त्याचा मृत्यु झाला. संतोष दोढकु भोयर वय 40 वर्षे रा. चिमढा असे मृतकाचे नांव आहे.

मूल तालुक्यातील चिमढा येथील संतोष दोढकु भोयर वय 40 वर्षे हे 9 नोव्हेंबर रोजी चिमढा शेतशिवारात दंत मंदीराजवळील एका शेतकÚयांच्या शेतात मजुरीसाठी गेला होता, दरम्यान एका विषारी सापाने त्याला दंश केल्याने त्याला मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले, संतोषवर मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर रेफर करण्यात आले, त्यांच्यावर चंद्रपूर येथील सामान्य रूग्णालयात उपचार सुरू असताना अखेर बुधवारी पहाटेच्या दरम्यान त्यांचा मृत्यु झाला.

कुटुंबातील कर्ता व्यक्तीचा मृत्यु झाल्याने संपुर्ण कुटुंब वाÚयावर आले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा आप्तपरीवार आहे.