वाघाचा म्हैसवर हल्ला : मूल तालुक्यातील घटना

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिमढा येथील अतुल लेनगुरे यांच्या गोठयातील म्हैसवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना शनिवारी रात्रोच्या सुमारास घडली. यामुळे गावात दहशतीची वातावरण निर्माण झाले आहे.

चंद्रपूर-गडचिरोली या राष्टीय महामार्गावर असलेल्या चिमडा या गावाला फारसे जगलं परिसर लागून नसताना सुद्धा रात्रौच्या वेळेस अतुल रमेश लेनगुरे चिमडा याच्या गोट्यातील म्हैसवर वाघाने हल्ला करून फरफटत नेऊन हिवराज ठेमस्कर याच्या शेतात नेऊन म्हैसवर ताव मारला.

टेकाडी येथे मागील काही महिण्यापासुन वन्यप्राण्याचे मानव आणि जनावरांवर हल्ले सुरू असतानाच आता चिमढा येथील म्हैसवर वाघाने हल्ला केल्याने चिमढा टेकाडी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहेे, वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांनी केली आहे.