अस्वलीच्या हल्यात शेतकरी जखमी

बल्लारपूर (प्रतिनिधी) : वनपरीश्रेत्रातील हरणपायली नियत शेत्रातातील काम करीत असताना शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला करून त्यास जखमी केल्याची घटना कोठारी जवळील हरणपायली शेतात घडली. कवडू नारायण आदे वय ६० वर्ष रा. कोठारी असे अस्वलीच्या हल्लात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नांव आहे.

कोठारी जवळील हरणपायली शेतात कवडु नारायण आदे वय 60 वर्षे हे धान कापणी झाली असता पुंजण्याचे संरक्षण करण्याच्या कामात असताना परिसरात फिरत असणाऱ्या अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. सदर शेतकऱ्याने आरडाओरड केली असता बाजूच्या शेतात पाळीव जनावरे चारत असलेल्या शेतकऱ्यांनी त्या दिशेने धाव घेतली आणि कवडू आदे यांचा जीव वाचला. मात्र या घटणेत कवडू नारायण आदे हा गंभीर जखमी झाला. सदर घटनेची माहिती वनविभागाचे वनपाल आर. सी. पेदापलीवार , पिआरटी टीमचे सदस्य विजय चोरमारे, विनोद मडावी यांना माहिती देण्यात आली. त्यानी तात्काळ घटनास्थळ गाठत जखमी शेतकऱ्यास स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर जखमीस चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हरणपायली परिसरात अस्वल, वाघ, बिबटाचा संचार असुन शेतकऱ्यात दहशत निर्माण झाली आहे.