चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक

दुचाकी चालक आणि पत्नी गंभीर जखमी

मूल (प्रतिनीधी) : दुचाकीने मुलाला भेटण्यासाठी जात असतांना मागुन चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकी चालक आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना मूल सिंदेवाही मार्गावरील चितेगांव येथे गुरूवारी दुपारच्या सुमारास घडली. वसंत रावजी नरोटे आणि ललिता वसंत नरोटे रा. माडेआमगांव ता. चामोर्शी असे जखमी पती पत्नीचे नांव आहे.

सिंदेवाही तालुक्यातील सरडपार येथे राहणाऱ्या मुलांना भेटण्यासाठी चामोर्शी तालुक्यातील माडेआमगांव येथील वसंत रावजी नरोटे आणि ललिता वसंत नरोटे हे दुचाकीीने जात होते, दरम्यान चितेगांव जवळील मुख्य रस्त्यावर गतिरोधक असल्याने दुचाकी चालकांनी वाहनाची गती कमी केली असता मागुन येणाऱ्या ब्रेजा चारचाकी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी धडक दिली, याअपघातात दुचाकी चालक आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली, जखमींना मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले, मूल येथे प्राथमिक उपचार करून चंद्रपूर रेफर करण्यात आले.

आरोपी चारचाकी वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय पंचबुध्दे करीत आहे.