वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा कायदा हातात घेवु : वर्षा लोनबले

वनविभागाच्या अधिकाऱ्याना निवेदन सादर

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिरोली परिसरातील 3 शेतकऱ्याचा वाघाच्या हल्लात नाहक जिव गेलेला आहे, यामुळे नागरीक दहशतीत जिवन जगत असुन सदर वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी मूल पंचायत समितीच्या माजी सदस्या वर्षा लोनबले यांच्यासह नागरीकांनी केली आहे.

मूल तालुक्यातील चिरोली परिसराच्या जवळपास मोठया प्रमाणावर प्रादेशिक आणि वनविकास महामंडळाचे जंगल आहे, यामुळे याभागात वन्यप्राण्यांचीही मोठया प्रमाणात रेचलेच असते, जंगलाला लागुनच शेतकÚयांची शेती सुध्दा आहे, काही दिवसातच वाघाच्या हल्लात तिन इसमाचा मृत्यु झाला यामुळे शेतकरी शेतात जाणे बंद केले आहे. यामुळे वनविभागाने वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, जंगलाला लागुन असलेल्या परिसराला कुंपन करण्यात यावे, रानडुक्कराला मारण्याची परवानगी देण्यात यावी, शेती करणाऱ्या शेतकऱ्याना झटका मशीन देण्यात यावे, जळावु बिट उपलब्ध करून देण्यात यावे, गॅस सिलेंडर सबसिडीवर उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी यावेळी निवेदनातुन करण्यात आली आहे.

निवेदन देताना मूल पंचायत समितीच्या माजी सदस्या वर्षा लोनबले, चिरोलीच्या सरपंच मिनल लेनगुरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रशांत रामटेके, वनसमितीचे अध्यक्ष महेश शिंदे यांचेसह शेकडो गावकरी यावेळी उपस्थित होते.