उश्राळा चक ग्राम पंचायत निवडणुकीत कॉग्रेसचा धुव्वा

सरपंचासह 7 सदस्य भाजपाचे निर्वाचीत

मूल (प्रतिनिधी) : 18 डिसेंबर रोजी पार पडलेल्या उश्राळा चक ग्राम पंचायतच्या सरपंच आणि सदस्यांच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचा धुव्वा उडाला असुन भाजपाच्या सरपंच पदाच्या उमेदवार प्रियंका लोकनाथ नर्मलवार यांच्यासह 7 सदस्य बहुमताने निवडुण आले असुन परंतु उश्राळा ग्राम पंचायतवर भाजपाचे वर्चस्व कायम आहे.

मूल तालुक्यातील 7 ग्राम पंचायतची निवडणुक 18 डिसेंबर रोजी पार पडली, 20 डिसेंबर रोजी मतमोजणी झाली, यामध्ये उश्राळा चक, गडीसुर्ला आणि बोंडाळा खुर्द या ग्राम पंचायतच्या सरपंचपदी भाजपाचे उमेदवार निवडुण आले तर बेंबाळ, आकापूर, बाबराळा आणि चकदुगाळा येथील सरपंचपदावर कॉंग्रेसचे उमेदवार निर्वाचीत झाले आहे, मूल तालुक्यातील उश्राळा चक येथे कॉंग्रेसचे धुरंधर नेतेमंडळी उमेदवाराच्या प्रचारासाठी रान ठोकले होते, तरीही भाजपाच्या प्रियंका लोकनाथ नर्मलवार हया सुमारे 400 च्या जवळपास मतानी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला पराजीत केलेले आहे. उश्राळा ग्राम पंचायतची निवडणुक माजी सरपंच देवानंद नर्मलवार आणि सामाजिक कार्यकर्ते लोकनाथ नर्मलवार यांच्या नेतृत्वात भाजपाने लढविली होती हे विशेष.

उश्राळा आणि उश्राळा चक यागावांचा सर्वांगीन विकास करण्याची संधी मला गावकÚयांनी दिली, यासंधीचे सोने करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचीत सरपंच प्रियंका लोकनाथ नर्मलवार यांनी दे धक्का एक्सप्रेसशी बोलतांना दिली.