कोंबडबाजारवर मूल पोलीसांची धाड

13 जणांवर गुन्हा दाखल: 3 लाख 38 हजारांचा मुद्देमाल जप्त

मूल (प्रतिनिधी) : अवैधरित्या कोंबडयांची झुंज लढवुन पैस्याची बाजी लावुन हारजितचा जुगार खेळणाÚया 13 जणांवर मूल पोलीसांनी गुन्हा दाखल केल्याची घटना मूल तालुक्यातील मंदातुकुम जवळ रविवारी घडली.

मूल तालुक्यातील मंदातुकुम गावाजवळ मागील अनेक दिवसांपासुन अवैधरित्या कोंबडयांची झुंज लढवुन पैस्याची बाजी लावीत असल्याची गोपनिय माहिती मूल पोलीसांना मिळाली, माहितीच्या आधारे मूल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पुरूषोत्तम राठोड यांच्या नेतृत्वात 8 जानेवारी रोजी रविवारी सायंकाळी 5 वाजता दरम्यान छापा मारले असता, त्याठिकाणी राहुन गजानन धोंगडे वय 47 वर्षे, रा. पळसगांव ता. बल्लारपूर, सचिन सुधाकर वासाडे वय 35 वर्षे रा. आमडी ता. बल्लारपूर, अरविंद सुंदरशहा सिडाम वय 37 वर्षे रा. कवडजई, ता. बल्लारपूर, चैतन्य विलास डाहुले वय 22 वर्षे रा. इंदिरानगर चंद्रपूर, रमेश साधुजी बलकी वय 33 वर्षे रा. इंदिरानगर चंद्रपूर, मनोज बंडु महाकुलकर वय 32 वर्षे रा. इंदीरानगर चंद्रपूर, बिंदुशिल वनवास राउत वय 32 वर्षे इंदिरानगर चंद्रपूर, घनश्याम गोपाळराव मोरे वय 39 वर्षे रा. इंदिरानगर चंद्रपूर, विलास भगवान शेडमाके वय 40 वर्षे वार्ड क्रं. 13 सावली, ओमप्रकाश मधुकर मोहुर्ले वय 40 वर्षे रा. वार्ड क्रं. 13 सावली, नागेश गोविंदा मांदाळे वय 40 वर्षे रा. वार्ड क्रं. 12 सावली, आनंद लक्ष्मण चलकलवार वय 65 वर्षे रा. वार्ड क्रं. 14 सावली, उत्तम पुरूषोत्तम मोहुर्ले वय 40 वर्षे रा. वार्ड क्रं. 12 सावली हे कोंबडा जुगार खेळताना मिळुन आले, त्यांच्या ताब्यातुन 4 जखमी कोंबडे, 2430 रूपये रोख, 7 अॅन्ड्रॉईड मोबाईल आणि 6 मोटार सायकल असा एकुण 3 लाख 38 हजार 430 रूपयांचा माल जप्त करून आरोपींविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीर्काअुन इंगळे, पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुरूषोत्तम राठोड, नापोअं चिमाजी देवकते, पोअं गजानन तुरेकर, संजय जुमनाके, अंकुश मांदाळे, स्वप्नील खोब्रागडे यांनी केले.