गुरांच्या चोरीत वाढ : पोलीसांचे दुर्लक्ष Increase in cattle theft

Increase in cattle theft
Increase in cattle theft

शिवसेनेचा आरोप

राजुरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील कढोली आणि परिसरात गुरांची मोठया प्रमाणावर चोरी केल्या जात असतानाही राजुरा पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहे, राजुरा पोलीस स्टेशनमध्ये Rajura Police Station कढोलीचे शेतकरी farmer प्रभाकर बोबडे यांनी बैलजोडी आणि गाय चोरीला गेल्याची तक्रार दिली मात्र अजुनही आरोपींना पोलीसांनी पकडले नसुन पोलिस तपासात दिरंगाई करीत असल्याचा आरोप शिवसेना shivsena नेते बबन उरकुडे यांनी केला आहे.

ग्रामीण भागात बैल व गाई चोरीच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. पोलिसांना तक्रार देऊनही पोलिस योग्य तपास करीत नाहीत, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. लगतच्या तेलंगणा सीमेवरून चंद्रपुर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात चोरट्या वाटेने गोवंश नेण्यात येते. अशा पैकीच एखादी टोळी ही बैलांची चोरी करत असावी, असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पोलिस तपास करण्यात उदासीनता दाखवित असल्याचा आरोप शिवसेना नेते बबन उरकुडे यांनी केला असून या गुरांच्या चोरीचा तातडीने तपास लावावा, अशी मागणी केली आहे. A large number of cattle are smuggled across the Telangana border from Chandrapur district