हीना हिरेन शहा यांचे निधन

Hina Hiran Shah
Hina Hiran Shah

मूल (प्रतिनिधी) : मुल शहरातील प्रतिष्ठित व्यापारी हिरेन गोगरी hiren gogri यांची पत्नी फिटनेस क्लबच्या संयोजीका हीना गोगरी hina gogri  यांची अखेर मृत्यूशी झुंज संपली. त्यांनी नागपूर येथील किंगस रुग्णालयात King’s Hospital आज अखेरचा श्वास घेतला. मागील वर्षी १४ आगस्ट ला त्यांना श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना चंद्रपूर येथे दवाखान्यात भरती करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर आणि नंतर एअर ॲम्बुलन्सने Air Ambulance हैदराबाद येथील केईएम रुग्णालयात KEM Hospital, Hyderabad उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Hina Hiran Shah1
Hina Hiran Shah1

तिथे तब्बल पाच महिने त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. पाच दिवसांपूर्वीच नागपूर येथील किंग्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले होतेे. हिरेंन गोगरी यांनी शक्य ते संपूर्ण प्रयत्न केले. शेवटपर्यंत त्यांनी आपल्या जीवनसांगिनी साठी संपूर्ण शर्थीचे प्रयत्न केले. पण आज दिनांक ०३ फेब्रुवारी २०२३ ला ३.१५ ला त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे सासूबाई, पती हिरेन गोगरी, मुले योग व निर आणि प्रचंड मोठा आप्त परिवार आहे. हीना गोगरी यांच्या निधनाने एक हसमुख, मनमिळाऊ व्यक्तिमत्व नेहमीसाठी लोप पावले असून शहरात शोककळा पसरली आहे There is mourning in the city

स्व. हिना हिरेण गोगरी येथील आठ वर्षापासून कार्यरत असलेल्या फिटनेस ग्रृपच्या संचालीका होत्या. या माध्यमातून स्व. हिना गोगरी यांनी महिलांच्या आरोग्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुस्वभावी स्वभाव आणि सेवाभावी व्यक्तीमत्वामूळे त्या महिला वर्गात त्या सुपरीचित होत्या.

दे धक्का एक्सप्रेस कडून भावपूर्ण श्रद्धांजली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here