अखेर सुधाकर अडबालेनी भाजपा समर्पीत ना. गो. गाणारांना अस्मान दाखविले Sudhakar Adbale reached the Legislative Council

Sudhakar Adbale reached Legislative Council
Sudhakar Adbale reached Legislative Council

फडणवीस, गडकरी यांना होमपिचवरच दणका Bang to Fadnavis, Gadkari

चंद्रपूर (प्रतिनिधी) : विमाशी संघाचे सुधाकर अडबाले sudhakar adbale ह्यांनी शिक्षक परिषदेचे उमेदवार तथा मागील दोन वेळा विधानपरिषद गाठणाऱ्या ना. गो. गाणार n g ganar ह्यांचा पराभव करून विधानपरिषद Legislative Council गाठली असुन त्यांनी प्रथम क्रमांकाच्या पसंतीचे निर्धारित मतदान प्राप्त केले असुन निकाल जाहीर करण्याची औपचारिकता बाकी आहे. नागपुर विभागातील शिक्षक मतदार संघाचे आमदार म्हणुन विदर्भातील शिक्षकांच्या समस्या मार्गी लावण्याचे तसेच जुनी पेन्शन Old Pension लागू करवून घेण्याचे मोठे शिवधनुष्य त्यांना पेलावे लागणार आहे.

Sudhakar Adbale reached Legislative Council1
Sudhakar Adbale reached Legislative Council1

मागील 12 वर्षांपासून गाणार हे शिक्षक मतदार संघातून प्रतिनिधित्व करत होते. साधे व्यक्तिमत्त्व असलेले गाणार मात्र शिक्षकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या जुन्या पेन्शनच्या मागणीवर समाधानकारक तोडगा काढू शकले नाही किंबहुना त्यांनी यासंदर्भात ठोस भूमिका घेतली नाही ह्याचाच फटका आजच्या निवडणूक निकालातून दिसत आहे, शिक्षक परिषदेच्या गाणार ह्यांना सत्ताधारी भाजपाने पाठिंबा दिला होता मात्र तरीही ते यश मिळवू शकले नाही, सत्तांतरानंतर झालेल्या ह्या पहिल्याच निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने भाजपाच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. Uneasiness has spread in the BJP fold

विजयी उमेदवार सुधाकर अडबाले ह्यांनी विधानपरिषद निवडणुकीची आधीपासूनच जोरदार तयारी केली होतीण् शिक्षकांचे संघटन, शिक्षकांची पतसंस्था तसेच वैयक्तिक संपर्क ह्या माध्यमातून त्यांनी मागील जवळपास 3 वर्षांपासून संपूर्ण मतदार संघ पिंजुन काढला होता. त्यातच मविआ ने विशेषतः काँगेस पक्षाने अखेरीस अंतर्गत मतभेद दुर सारून सुधाकर अडबाले ह्यांना समर्थन दिले. मिळालेले भक्कम समर्थन, स्वतःचे असलेले संपर्क तसेच जुनी पेन्शन लागु करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन ह्यामुळे सुधाकर अडबाले ह्यांचा विजय सुकर झाला. ह्यापूर्वी चंद्रपूरच्या मतदारांनी नाना शामकुळे nana shamkule  ह्यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत केले होते. विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे संदिप जोशी sandip joshi ह्यांचा पराभव होऊन काँग्रेस पक्षाचे अभिजित वंजारी MLA Abhijit Wanjari विजयी झाले तर लागोपाठ तिसऱ्यांदा झालेल्या निवडणुकीत भाजपला धक्का देत सुधाकर अडबाले sudhakar Adbale हे विधानपरिषदेचे सदस्य झाले आहेत. पहिल्या फेरीतच विजयी होऊ असा विश्वास दोन्ही प्रमुख उमेदवारांना होता मात्र मतदारांनी पहिल्या पसंतीचा कौल सुधाकर अडबाले ह्यांना दिला असुन त्यांना १४०७१ मते प्राप्त झाले असुन त्यांचे नजिकचे प्रतिस्पर्धी ना. गो. गाणार ह्यांना ६३०९ मतदारांनी आपली प्रथम पसंती दिली. सुधाकर अडबाले ह्यांना पहिल्या फेरीअखेर 7 हजारांहून जास्त मताधिक्य प्राप्त झाले आहे. ह्या निवडणुकीत कोणत्या जिल्ह्यातून कुणाला किती मतदान झाले हे स्पष्ट होत नसले तरीही चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्ह्याने खंबीर साथ दिल्याने सुधाकर अडबाले ह्यांचा विजय झाल्याचे मानले जाते.

चंद्रपूर शहरात स्थाईक असलेले हे तिसरे आमदार ठरले असुन तब्बल 75 वर्षांनंतर चंद्रपूर जिल्ह्याला विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी सुधाकर अडबाले ह्यांच्या रूपाने मिळाली आहे. चंद्रपूर शहरात वास्तव्य करणारे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार वन तथा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधिर मुनगंटीवार Sudhir mungantiwar, किशोर जोरगेवार kishor Jorgewar ह्यांच्या पाठोपाठ सुधाकर अडबाले आमदार झाल्याने चंद्रपूर वासीयांच्या आशा अधिकच पल्लवित झाल्या असुन शहरासह जिल्ह्याच्या विकासात भर पडेल असा आशावाद अनेकांनी व्यक्त केला आहे.