राजोली ग्राम पंचायतच्या वतिने हातपंपाचे भुमिपुजन Gram Panchayat Rajoli

Gram Panchayat Rajoli
Gram Panchayat Rajoli

राजोली (प्रतिनिधी) : नागरीकांना पाण्याची समस्या निर्माण होवु नये यासाठी ग्राम पंचायतच्या Gram Panchayat Rajoli वतिने वार्ड क्रं. 2 मध्ये हातपंपाचे भुमिपुजन सरपंच जितेंद्र लोणारे आणि सदस्य पल्लवीताई श्याम पुठ्ठावार यांच्या हस्ते नुकताच करण्यात आले. Bhumipujan of hand pump

मूल तालुक्यातील मौजा राजोली ग्राम पंचायतच्या वतिने पंधरा व्या वित्त आयोगातुन Fifteenth Finance Commission मंजुर झालेल्या निधी मधुन राजोली येथील वार्ड नं. 2 मध्ये गुरुदेव सेवा मंडळाजवळ हातपंपाचे भुमिपुजन पार पडले. वार्डात पाण्याची समस्या निर्माण होवु नये यासाठी ग्राम पंचायतने वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे पंधरा व्या वित्त आयोग मधुन निधी मंजुर झाली होती.दरम्यान हातपंपाचे भुमिपुजन राजोली ग्राम पंचायतचे सरपंच जितेंद्र लोणारे jitendra Lonare, वार्डाच्या सदस्या पल्लवीताई श्याम पुठठावार यांच्या हस्ते विधीवत पुजन करून कामाला सुरूवात सुरूवात करण्यात आले. यावेळी सदस्य रामभाऊ कोटरंगे, सुनिल गुज्जनवार, बटी निकुरे, सामाजिक कार्यकर्ते श्याम पुठावार, गजु पा ठिकरे, निखिता खोब्रागडे उपस्थित होते