महिलांसाठी कुकुटपालन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न Poultry training workshop for women held

One Day Poultry Training
One Day Poultry Training

महिला आर्थिक विकास महामंडळाचा पुढाकार

सावली (प्रतिनिधी) : महिला आर्थिक विकास महामंडळ शाखा मूलच्या वतीने सावली saoli  येथे महिलासाठी एक दिवसीय कुकूटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे One Day Poultry Training आयोजन करण्यात आले होते. Poultry training workshop for women held

मानव विकास कार्यक्रम सन 21.22 अंतर्गत कुकूटपालन करणाऱ्या महिलासाठी कुकूटपालन करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील शास्त्रीय उपाय यावर त्यांना ज्ञान मिळावे हा उद्देश ठेऊन महिला आर्थिल विकास महामंडळ शाखा मूल आणि मैत्रीण लोकसंचालित साधन केंद्र मूल यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय वैयक्तिक कुकुटपालन गटांसाठी प्रशिक्षण देण्यात आले. Women Economic Development Corporation

महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाचे चंद्रपूर सेतू सल्लागार प्रवीण बावणे आणि मूल तालुक्यातील यशस्वी कुकुटपालन व्यवसायिक अक्षय पुपरेड्डीवार उपस्थित होते. यावेळी पुपरेड्डीवार यांनी महिलांना दैनंदिन कुकूटपालनातील अडचणी आणि त्यावर उपाय कसे करायचे यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळ सावलीच्या व्यवस्थापक देवेंद्रा मेश्राम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.