महिलांकडून कर्जाच्या नावाखाली १०९ महिलांची फसवणूक Cheating on women

Cheating on women
Cheating on women

पोलिसांत तक्रार दाखल

चिमूर (प्रतिनिधी) : सामूहिक कर्ज तात्काळ मिळवून देत असल्याचे आमिष दाखवून नागपूर Nagpur जिल्ह्यातील दोन महिलांनी चिमूर तालुका गेल्या काही दिवसात पालथा घातला. दरम्यान, त्या महिलांच्या जाळ्यात अडकलेल्या १०९ महिलांची Cheating on women फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला असून, चार महिने लोटूनही लोन मिळत नसल्याने महिलांनी थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे. Filed a police station complaint

नागपूर जिल्ह्यातील दोन महिला चिमूर तालुक्यातील कोटगाव, मुरपार, खडसंगी, बोथली, नेरी व इतर गावात जाऊन एक लक्ष रुपये समूह कर्ज देण्याचे आमिष देत होत्या. आधार कार्ड, घरटॅक्स पावती, पॅन कार्ड, वीज बिल या आधारावर एक लक्ष रुपये देण्यासाठी वारंवार महिलांच्या भेटी घेत होत्या. आमची बँक नागपूर येथे असल्याची बतावणी त्यांनी केली. त्या महिलांविषयी चौकशी केली असता एजंट असल्याची माहिती मिळाल्याचे अन्यायग्रस्त महिलांनी नगदी किंवा फोन पे द्वारे १५०० रुपये त्यांच्याकडे भरले. एक महिन्याच्या आत तुम्हाला लोन देतो, असे त्यांनी सांगितले. एक महिना झाल्यानंतर एजंट महिलांनी खडसंगी येथे महिलांना बोलावून लोन पास झाल्याचे सांगून पासबुकची झेरॉक्स मागवून पुन्हा विमा, जीएसटी लागेल असे सांगून प्रत्येकी ३ हजार ५०० रुपये जवळपास १०९ महिलांकडून उकळले. मात्र, चार महिने होऊनही लोन न मिळाल्याने महिलांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी चिमूर पोलीस स्टेशन गाठत दोन महिला व एका पुरुषाविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, फसवणूक झालेल्या महिलांनी आमदार कीर्तीकुमार भांगडिया MLA Kirti Kumar Bhangdia यांच्याही जनसंपर्क कार्यालयात जाऊन निवेदन दिले. यावेळी कार्यालय प्रमुख अरुण लोहकरे व विक्की कोरेकार यांनी महिलांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.