विद्युत प्रवाहाने अस्वलाचा मृत्यु Bear electrocuted to death

Bear electrocuted to death
Bear electrocuted to death

अंतरगांव पारडवाही येथील शेतशिवारातील घटना

मूल (प्रतिनिधी) : पिकाच्या संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहाने एका नर जातीच्या अस्वलाचा मृत्यु झाल्यची घटना अंतरगांव पारडवाही शेतशिवारात गुरूवारी उघडकीस आली. गोपीनाथ शेंडे Gopinath Shende यांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. Bear electrocuted to death

मूल येथील शेतकरी सुधीर कावळे यांची अंतरगाव पारडवाही येथे शेती आहे, सदर शेती त्यांनी गोपीनाथ शेंडे यांना भाडेतत्वावर करण्यासाठी दिली होती, श्री. शेंडे यांनी सदर शेतामध्ये मका पिकाचे उत्पन्न घेत होते. काही दिवसापासुन वन्यप्राण्यामुळे मका पिकाचे नुकसान होत असल्याने त्यांनी शेतातुन गेलेल्या महावितरणच्या खांबावर आकडा टाकुन शेताच्या सभोवताल तार लावुन विद्युत प्रवाह सोडला होता, सदर विद्युत प्रवाहाने दोन वर्षाच्या नरजातीच्या अस्वलाचा घटनास्थळावर मृत्यु झाला.

सदर घटनेची माहीती होताच क्षेत्र सहायक मस्के, वनरक्षक राकेश गुरनुले सुभाष मरस्कोल्हे आणि संजिवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, प्रभाकर धोटे घटनास्थळावर पोहचुन संपुर्ण घटनेची माहिती विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे आणि चिचपल्लीच्या वनपरिक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे यांना दिली. वनाधिकाÚयांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी गोपीनाथ मंगरू शेंडे याला ताब्यात घेतले व त्याचे कडुन विद्युत प्रवासासाठी वापरलेले वायर आणि आकडा टाकण्यासाठी वापरलेली काठी जप्त केली.

घटनास्थळी विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे Prashant Khade, चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका वेलमे Priyanka Velme, महावितरण मूल चे सहाय्यक अभियंता पंकज उजवने, संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, प्रभाकर धोटे, प्राणी उपचार केंद्र चंद्रपूरचे डॉक्टर कुंदन पोडचलवार, क्षेत्रसहाय्यक मोरेश्वर मस्के, वनरक्षक सुभाष मरस्कोले, वनरक्षक राकेश गूरनुले व वनमजूर उपस्थित होते. मृत अस्वलाला मूल येथे शवविच्छेदन करून दहन करण्यात आले.