फिस्कुटी ग्राम पंचायतचा भोंगळ कारभार चव्हाटयावर
मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील अतिचर्चीत फिस्कुटी ग्राम पंचायतमध्ये मागील 2 वर्षापासुन मोठया प्रमाणावर विकासकामाच्या नावावर नियमाला डावलुन कामे केल्या जात होती, वेगवेगळे साहित्य जादा दराने खरेदी केल्याची बाब उजेडात येताच जिल्हयाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते, त्यानिवेदनासोबत जोडलेल्या पुराव्याच्या आधारे राज्याचे वन, सांस्कृतीक कार्य, आणि मत्स्य व्यवसायमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहे. 30 जानेवारी रोजी झालेल्या तक्रारीवरून मूल पंचायत समितीला 13 मार्च रोजी समिती गठीत करून चौकशी करण्याचे पत्र प्राप्त झाल्याची विश्वसनिय माहिती आहे. Zilla Parishad orders inquiry to Panchayat Samiti
मूल तालुक्यातील फिस्कुटी ग्राम पंचायत अंतर्गत ऑफलाईन निवीदेच्या माध्यमातुन एकाच कंत्राटदाराला 1.27 करोड रूपयाची सुमारे 45 कामे देण्यात आले आहे, 18 लाख रूपयाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाच्या कार्यरंभ आदेश आणि करारनाम्यामध्येही अनेक त्रुटया आढळुन येत आहे, सन 2020-21 या आर्थीक वर्षात जिल्हा निधी अंतर्गत मंजुर झालेल्या निधीतून जेईएम (गव्हरमेंट ई मार्केट) पोर्ललवरून निवीदा प्रक्रिया न राबविताच वेगवेगळे साहित्य खरेदी केलेले आहे. फिस्कुटी ग्राम पंचायतने 3 लाखाच्या व्हिजीटर अँड हायबॅक खुर्ची 23 नग खरेदी केले, 3 लााखाच्या 30 नग स्टिल खुर्ची र्थी सिटर, प्रती कुटुंब 1 वॉटर कॅन याप्रमाणे सुमारे 5 लाख रूपयाच्या 720 रूपये प्रती नग प्रमाणे 693 कॅन खरेदी केल्याचे दिसुन येत आहे. 3 लाख रूपयांची घंटागाडी, 2 लाख रूपयाचे ई रिक्षा, वाचनालय नसलेल्या गावात वाचनालयासाठी 7 लक्ष रूपये खर्च करून 17 नग आलमारी आणि 18 नगर बुककेस घेतल्याचे दाखविण्यात आले आहे, 23 हजार रूपयाची आलमारी आणि 19 हजार 151 रूपयाची बुककेस घेतले आहे. जि एस टी नबर नसलेल्ला बिल मंजुर करून 2 लाखाचे 2 संगणक आणि प्रिंटर्स घेतलेले आहे. सन 2020-21 यावर्षात 3 लक्ष रूपयाचे 16 नग स्टिल कचराकंडी घेतलेले आहे, यासह फिस्कुटी ग्राम पंचायतच्या विविध साहित्य आणि बांधकामची तक्रार करण्यात आली होती.
यासंपुर्ण कामाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे वन, सांस्कृतीक कार्य आणि मस्त्य व्यवसायमंत्री नामदर सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी यांना दिलेले होते, प्रकरणाची दखल घेत जिल्हा परिषदेने 13 मार्च रोजी ईमेलनी मूल पंचायत समितीकडे तक्रार पाठवुन समिती गठीत करून चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहे.
निपक्षपाती चौकशी होणे गरजेचे
फिस्कुटी ग्राम पंचायतने नियमबाहय साहित्याची खरेदी आणि बांधकाम प्रकरणाची निपक्षपणे चौकशी होणे गरजेचे आहे, याबाबत गावकऱ्यांनीही तक्रार केलेली आहे. मात्र सदर प्रकरणाची चौकशी होण्यापुर्वीच अहवाल आपल्या बाजुने कसे तयार करून घेता येईल यासाठी काही अधिकाऱ्यांशी ‘‘सेटींग’’ करीत असल्याची चर्चा सुरू आहे.
समिती गठीत करून चौकशी करू : गटविकास अधिकारी देव घुनावत
फिस्कुटी ग्राम पंचायत संबधाने केलेल्या तक्रारीवरून समिती गठीत करून चौकशी करण्याचे आदेश प्राप्त झाले आहे, त्यानुसार लवकरच समिती गठीत करून चौकशी करू अशी प्रतिक्रिया मूल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देव घुनावत यांनी दिली.