आता ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या महिलांना 50 टक्के सुट Travels Association

Travels Association
Travels Association

चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोशिएशनची घोषणा

मूल (प्रतिनिधी) : परिवहन महामंडळाच्या बसनी प्रवास करणाऱ्या महिलांसाठी सरसरकट 50 टक्के सुट देण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने केली आहे, आता चंद्रपूर गडचिरोली ट्रॅव्हल्स असोशिएशननेही Chandrapur Gadchiroli Travels Association प्रवास करणाऱ्या महिलांसाठी 50 टक्के सुट देत असल्याची घोषणा गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर करण्यात आल्याने महिलांनी याघोषणेचे स्वागत केले आहे. 50 percent off for women traveling with Travels

महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या महिलासाठी ५० टक्के सुट देण्याची घोषणा करण्यात आली होती, त्यानुसार परिवहन विभागाने Department of Transport सदर घोषणेची अमलबजाणी करणे सुरू केले आहे. त्याच घोषणेचा धागा पकडत चंद्रपूर गडचिरीलो ट्रॅवल्स असोसिएशनने ट्रॅव्हल्सने प्रवास करणा़ऱ्या महिलाकरिता तिकिटमध्ये ५०ः टक्के विशेष सूट देण्याची घोषणा केली. 50% special discount on tickets for women

चंद्रपूर गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या सदस्यांनी तात्काळ बैठक घेवुन महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला प्रतिसाद देत ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या महिलासाठी ५०ः तिकिटमध्ये सूट देण्याची घोषणा करून त्याची अंमलबजावनी उद्यापासून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्त साधत करण्याचे ट्रॅव्हल्स असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यानी जाहीर केले.