संगणक अभियंता तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या suicide

गडचिरोली (प्रतिनिधी) : गडचिरोली येथील एक युवा तरुणी पुणे येथील एका खाजगी कंपनीत संगणक अभियंता म्हणून नौकरीवर आहे.या तरुणीने पुण्यातील फ्लॅटमध्येच  18 मार्चला रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस आहे. आत्महत्या करणाऱ्या अभियंता तरुण युवतीचे नाव सायली वासुदेव बट्टे (24)वर्ष sayli Wasudev Batte रा. झांसीनगर गडचिरोली असे आहे. A young computer engineer committed suicide by hanging herself
प्राप्त माहितीनुसार गडचिरोली येथील एका राजकीय पक्षाच्या नेत्याची मुलगी सायली वासुदेव बट्टे (24) वर्ष रा.झांसीनगर, चंद्रपूर रोड गडचिरोली Gadchiroli येथील रहिवाशी असून ती पुणे शहरात शिक्षण आणि नौकरीसाठी आलेली होती.तसेच ती पुण्यात हिजवडी परिसरात फ्लॅट घेऊन राहत होती.सदर तरुणीने दिनांक (18)मार्च 2023 ला रात्रीच्या दरम्यान फ्लॅटमधील खोलीत आत्महत्या केल्याची घटना दुसऱ्या 19 मार्चला सकाळी उघडकीस आली.आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.या घटनेचा तपास पोलीस करीत आहे.