बस केबिनला आग ; सतर्कमुळे टळली जीवितहानी Bus cabin fire

Bus cabin fire
Bus cabin fire

सिंदेवाही येथील घटना ; प्रवाशांनी मारल्या उड्या

सिंदेवाही (प्रतिनिधी) : राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या केबिनला अचानक आग लागल्याने, प्रवाशांनी खिडकीतून उड्या मारल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सिंदेवाही जुन्या बस स्थानकावर घडली. Incident at Sindewahi आगीने रौद्र रूप धारण करण्यापूर्वीच क्षणाचाही विलंब न करता आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. Loss of life avoided due to vigilance

ब्रह्मपुरी आगाराची चंद्रपूरकडे जाणारी एमएच ४० एक्यू 6068 क्रमांकाची बस सिंदेवाही येथील जुन्या जुना बस स्थानक परिसरात दुपारी २.३० वाजताच्या सुमारास थांबली. Brahmapuri Agar या बसमध्ये प्रवाशी खचाखच भरून होते. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या सर्वाधिक होती. बसमधील बॅटरीच्या वायरिंगने अचानक पेट घेतल्यामुळे केबिनला आग लागली. केबिनमधून आगीचा धूर निघाला होता. हे दृश्य बस स्थानकावर प्रवाशी व चालक वाहकांना दिसल्याने त्यांनी आरडाओरडा करून आतील प्रवाशांना सतर्क केले. लगेच पाण्याच्या बादल्या घेऊन आग विझविण्यास धाव घेतली. तोपर्यंत बसमधील प्रवाशांना याची काही कल्पना नव्हती. केबिनला आग लागल्याचे कळताच, आतील प्रवाशांनी जीवाच्या आकांताने मागील खिडकीतून उड्या मारून बाहेर पडली. A battery wiring in the bus suddenly caught fire, causing the cabin to catch fire