दारूच्या नशेत पित्यानेच केली मुलाची हत्या Drunken father kills son

The father killed the son1
The father killed the son1

मूल तालुक्यातील राजोली येथील घटना

राजोली (प्रतिनिधी) : दारूच्या आहारी गेलेल्या एका पित्याने पोटच्या मुलाची गळा दाबुन खुन केल्याची घटना रविवारी पहाटे 5 वाजताच्या दरम्यान राजोली Rajoli येथे घडली. गळा दाबुन हत्या केलेल्या पित्याने स्वतःच्या गळावर चाकुने वार करून आत्महत्या suicide करण्याचा प्रयत्न केला. प्रियांशु गणेश चौधरी वय 3 वर्षे Priyanshu Ganesh Chaudhary असे गळा दाबुन खुन केलेल्या बालकाचे नांव आहे तर गणेश विट्टल चौधरी वय 31 Ganesh Chaudhary वर्षे असे पोटच्या मुलाचा खुन करणाऱ्या पित्याने नांव आहे. Drunken father kills son

Father kills son
Father kills son

मूल तालुक्यातील राजोली येथील गणेश विट्टल चौधरी वय 31 वर्षे हा आपल्या पत्नी काजल आणि मुलासह राजोली येथे राहात होता, हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तो दारू पिऊन पत्नीला मारहाण केल्याने ती घरून निघुन गेली, घरी स्वतः गणेश आणि मुलगा प्रियांशु राहात होता, दरम्यान रविवारी पहाटे 5 वाजता दरम्यान त्याने दारूच्या नशेत मुलगा प्रियांशु याचा गळा दाबुन खुन केला, आणि स्वताच्या गळावर चाकुने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. Beating his wife after drinking alcohol

सदर घटनास्थळावर पोहकॉ प्रकाश खाडे आणि सहकाऱ्यानी धाव घेवुन पंचनामा केला असुन प्रियांशुचे पार्थीव विच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले होते. मुलाची हत्या करणाऱ्या पित्याविरूध्द मूल पोलीस स्टेशनमध्ये कलम 302, 309 भांदवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

चौधरी परिवारातील आई, वडील, भावाचीही आत्महत्या
गणेश चौधरी यांचे वडील विट्टल चौधरी यांनी मुलांच्या त्रासांमुळे 3 वर्षापुर्वी आत्महत्या केल्याची चर्चा आहे, त्यानंतर काही महिण्यानी आई आणी एका भावानेही विष प्राशन करून आपली जिवणयात्रा संपविली होती हे विशेष. आता पोटच्या मुलाचा खुन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न याचपरिवारातुन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.