10 वी, 12 वी नंतर पुढे काय? यावर मार्गदर्शन What next after 10th, 12th?

What next after 10th, 12th?
What next after 10th, 12th?

डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचा उपक्रम

मूल (प्रतिनिधी) : येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाच्या An initiative of Dr Shyamaprasad Mukherjee Library वतीने १० वी आणि १२ विच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि निर्णय क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने व्यक्तिमत्व विकास व शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन 19 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता वाचनालयाच्या सभागृहात केले आहे. What next after 10th, 12th?

कार्यशाळेचे उदघाटन बल्लारपूर नगर पालिकेचे माजी अध्यक्ष हरीश शर्मा Harish Sharma यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. विशेष अतिथी म्हणून गोंडवाना सैनिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक ओमप्रकाश संग्रामे Omprakash Sangrame राहणार आहेत. प्रमुख मार्गदर्शन म्हणून प्रा. डॉ. राकेश चडगुलवार Pro. Dr. Rakesh Chadgulwar, प्रा. मनीषा भडंग Pro. Manisha Bhadang उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

शहरी भागासोबतच ग्रामीण भागातिल युवकांना व्यक्तीमत्व विकास आणि शैक्षणिक मार्गदशन मिळत नाही. यामुळे भविष्यात घ्यावयाचे अनेक निर्णय चुकतात, ज्ञानात भर पडुन निर्णय क्षमता वाढावे यासाठी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय मूलच्या वतीने १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास आणि शैक्षणिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे.

शिबिराला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मूल नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष प्रवीण मोहुर्ले, सामाजिक कार्यकर्ते संजय मारकवार, प्रज्योत रामटेके, प्रमोद कोकुलवार, जलतरण संघटनेचे प्रवीण मोहुर्ले यांनी केले.